BJP youth leader Shivam Singh succumbed to injuries after a brutal assault outside a Lucknow club following a minor dispute. saam tv
देश विदेश

भाजपच्या दिग्गज नेत्याची हत्या; कारण ठरलं सिगारेट, राजकारणात खळबळ

Minor Argument Turns Fatal BJP Leader Killed Outside Club in Lucknow: लखनऊमध्ये किरकोळ सिगारेटच्या वादातून भाजप युवा नेते शिवम सिंह यांची निर्घृण हत्या झाली. या घटनेनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून पोलिस तपास सुरू आहे.

Saam Tv

उत्तरप्रदेशची राजधानी लखनऊ येथे गुन्हेगारीच्या घटना कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीये. ताजे प्रकरण विभूती खंड पोलीस ठाण्याचा हद्दीतील जलवा क्लबबाहेर स समोर आले आहे. किरकोळ कारणावरून भाजपच्या युवा नेत्याची तिघा तरुणांनी मारहाण करून हत्या केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. जखमी अवस्थेत युवकाला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयोध्येचे भाजप युवा मोर्चाच्या जिल्हा समितीचे सदस्य शिवम सिंह (रा.रामनगर धोरहरा गाव) हे 25 मे रोजी आपल्या मित्रांसह नीलेश मौर्य आणि जीशान लखनऊ येथे पार्टीसाठी आले होते. 26 मे रोजी पहाटे सुमारे 3 वाजता ते क्लबमधून बाहेर पडले असता बाईकवर आलेल्या तिघा अज्ञात तरुणांनी शिवमकडे सिगारेट मागितली, शिवम यांनी एकदा सिगारेट दिली, मात्र दुसऱ्यांदा देण्यास नकार दिला.

यामुळे संतप्त झालेल्या त्या तिघांनी शिवम यांना मारहाण केली आणि तेथून पळ काढला. शिवम यांनी आपल्या परिचित आशीष यांनी त्यांना वाद टाळून घरी जाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर शिवम आणि त्यांचे मित्र कारने निघाले. मात्र रस्त्यात त्यांना पुन्हा त्याच युवकांनी अडवले आणि कारवर दगडफेक सुरू केली. त्यामुळे कार थांबवावी लागली. शिवम कारमधून बाहेर पडताच हल्लेखोरांनी त्यांच्या डोक्यावर विटा आणि दगडांनी हल्ला केला. रक्तबंबाळ अवस्थेत शिवम रस्त्यावर कोसळले. या घटनेनंतर त्यांच्यासोबत असलेले मित्र नीलेश, जीशान त्यांना रस्त्याच्या कडेला सोडून पळून गेले. पहाटे सुमारे चार वाजता एका प्रवाशाने जखमी अवस्थेत पडलेल्या शिवम यांना पाहिले आणि पोलिसांना माहिती दिली.

पोलिसांनी शिवम यांना डॉक्टर राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्यांना गोमतीनगर येथील केएनएस रुग्णालयात हलवण्यात आले. ICU मध्ये उपचार सुरू असताना त्यांची प्रकृती खलावत गेली आणि 26 मेच्या रात्री सुमारे 12 वाजता त्यांचा मृत्यू झाला. शिवम यांचे पुतणे आयुष सिंह यांनी सांगितलं की, शिवम यांनी आशीषला फोनवर गाडीवर दगडफेक होत असल्याचं सांगितलं होतं. मात्र ते घटनास्थळी पोहोचल्यावर कोणीही दिसलं नाही. दरम्यान, नीलेश मौर्य २७ मे रोजी पोलीस ठाण्यात हजर झाला आणि त्याने कबूल केलं की भीतीपोटी ते शिवम यांना सोडून पळाले होते. दरम्यान, भाजप नेते अभिषेक प्रताप सिंह यांनी पोलिसांच्या कारवाईवर नाराजी व्यक्त करत, पोस्टमॉर्टम आणि औपचारिकतेपलीकडे कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

Maharashtra News Live Update: नवनाथ वाघमारे यांच्यावर गुन्हा दाखल करा; मराठा क्रांती मोर्चाची मागणी

Social media workouts: सोशल मीडियावरचे हे फिटनेस ट्रेंड फॉलो करताय? ही चूक करू नका, मणक्याला होऊ शकते गंभीर इजा

Maharashtra Freedom of Religion Act : धर्म स्वातंत्र्य कायदा रक्षाबंधनापासून लागू, राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध

SCROLL FOR NEXT