BJP Worker Killed  Saam tv
देश विदेश

BJP Worker Killed: भाजप कार्यकर्त्याची निर्घृण हत्या, विजय मिरवणुकीत रक्तरंजित थरार

BJP Worker Killed In West Bengal: पश्चिम बंगालमध्ये भाजपने टीएमसीचा दारुण पराभव केला. या विजयानंतर भाजपकडून काढण्यात आलेल्या विजय मिरवणुकीमध्ये रक्तरंजित थरार झाला. भाजप कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली.

Priya More

Summary -

  • पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या विजय मिरवणुकीदरम्यान हिंसक घटना

  • भाजप कार्यकर्त्याची धारदार शस्त्राने वार करत हत्या

  • टीएमसी कार्यकर्त्यांनी हत्या केल्याचा आरोप

पश्चिम बंगालमध्ये भाजपने टीएमसीचा पराभव करत सत्ता मिळवली. गेल्या अनेक वर्षांपासून भाजपचा पश्चिम बंगालमध्ये पराभव होत होता. पण यंदाची विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने जोरदार बाजी मारली. विजयानंतर भाजपकडून पश्चिम बंगालमध्ये मिरवणूक काढण्यात आली. भाजपच्या विजय मिरवणुकीवर टीएमसीकडून हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात तणाव वाढला आहे. मोठा पोलिस बंदोबस्त घटनास्थळी तैनात करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बालिगुडीच्या न्यूटाऊन परिसरात विजय मिरवणुकीदरम्यान एका भाजपच्या कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली. विजय मिरवणुकीदरम्यान भाजप कार्यकर्त्याला मारहाण करत धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या भाजप कार्यकर्त्याला रुग्णालयात नेत असतानाच त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात तणावपूर्ण परिस्थिती आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता मोठा पोलिस बंदोबस्त घटनास्थळी तैनात करण्यात आला.

या घटनेनंतर टेक्नो सिटी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. मधू मंडल असं हत्या झालेल्या भाजप कार्यकर्त्याचे नाव होते. आरोप केला जात आहे की, भाजपच्या मिरवणुकीदरम्यान टीएमसी आणि भाजप कार्यकर्ते आमने सामने आले. त्यानंतर टीएमसी कार्यकर्त्यांनी मधू मंडल यांना घेराव घालत बेदम मारहाण केली. त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. रुग्णालयात नेण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला.

बालिगुडी परिसरातील परिस्थिती अत्यंत संवेदनशील आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी टेक्नो सिटी पोलिस ठाण्यातून एक पथक घटनास्थळी दाखल झाले आणि अतिरिक्त पोलिस दल तैनात करण्यात आले आहे. कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी परिसरात केंद्रीय सुरक्षा दलही तैनात करण्यात आले आहे. या घटनेनंतर, स्थानिक नागरिकांनी आणि मृत भाजप कार्यकर्त्याच्या नातेवाईकांनी आंदोलन सुरू केले आहे. संतप्त नागरिकांनी आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ICC Ranking : आयसीसी टी २० रँकिंग जाहीर; टीम इंडिया कितव्या स्थानी?, टॉप १० संघ कोणते?

Maharashtra News Live Update: टँकर वेल्डिंग करताना स्फोट, एक कामगार गंभीर जखमी.

कल्याण हादरलं! २१ लाखांचा १०७ किलो गांजा जप्त, वसीम खानसह तिघांच्या आवळल्या मुसक्या

Face Care: ओपन पोर्समुळे चेहरा खराब दिसतोय? मग हे ५ सोपे घरगुती उपाय करुन मिळवा क्लिन आणि सॉफ्ट चेहरा

अटकेची भीती दाखवून ७ लाख रुपये उकळले; पुण्यातील पोलीस उपनिरीक्षकासह ३ कर्मचारी बडतर्फ, कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ

SCROLL FOR NEXT