bjp politics  Saam tv
देश विदेश

उत्तर प्रदेशमध्ये सत्ता समीकरण बदललं; ब्राह्मण समाजाच्या आमदारांच्या नाराजीनंतर भाजप करणार मोठे बदल

uttar pradesh politics : उत्तर प्रदेशमध्ये ब्राह्मण समाजाच्या आमदारांच्या नाराजीनंतर भाजप मोठे बदल करणार आहे. उत्तर प्रदेशमध्ये सत्ता समीकरण बदलल्याने भाजप मोठा निर्णय घेत आहे.

Vishal Gangurde

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप उत्तर प्रदेशमध्ये सक्रिय

ब्राह्मण आमदारांच्या नाराजीनंतर पक्षात बदल होणार

पक्षातील विविध समाज संघटना, युवा आणि महिला मोर्चात फेरबदल

उत्तर प्रदेशमध्ये पुढील विधानसभा निवडणुका होणार आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजपने उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे.

उत्तर प्रदेशमध्ये २०२७ साली विधानसभा निवडणूक होणार आहे. भाजप विविध मुद्द्यांवरून पक्ष संघटन मजबूत करत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजप पुढील १५ दिवसांत पक्षात मोठे बदल करणार आहे. मतदार यादी दुरुस्ती मोहीम पूर्ण झाल्यानंतर भाजप पक्षात मोठे बदल करणार आहे.

उत्तर प्रदेशमध्ये भाजपने विविध समाजाच्या संघटना, युवा मोर्चा, महिला मोर्चा आणि इतर संघटनेत बदल करण्यात येणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजप २८ फेब्रुवारी रोजी ही प्रक्रिया पूर्ण करणार आहे. संघटनेत बदल केल्यानंतर भाजप निवडणुकीसाठी दंड थोपटणार आहे.

उत्तर प्रदेशमध्ये यूसीजीच्या नव्या नियमावरून ब्राह्मण आमदारांच्या नाराजीनंतर पक्षात मोठे बदल करण्याची शक्यता आहे. भाजप पक्षातील विविध समाजाच्या संघटनेत बदल सत्ता समीकरण साधण्याची शक्यता आहे. भाजप उत्तर प्रदेशमध्ये जाट, यादव, ब्राह्मण समाजाच्या संघटनावर विशेष लक्ष देण्याची शक्यता आहे.

उत्तर प्रदेशमध्ये आता पंचायत समिती, विधानपरिषदेच्या एकूण ११ शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका होणार आहेत. त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका होतील. या निवडणुकीसाठी भाजपही मोठी तयारी करण्याची शक्यता आहे.

उत्तर प्रदेशमध्ये भाजप बदल का करतंय?

विधानसभा निवडणूक आणि ब्राह्मण आमदारांच्या नाराजीनंतर भाजप संघटन मजबूत करण्यासाठी मोठे बदल करत आहे.

भाजप कोणत्या समाजावर विशेष लक्ष देणार?

भाजप जाट, यादव आणि ब्राह्मण समाजाच्या संघटनांवर विशेष लक्ष केंद्रित करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai T20 League: टी-२० लीगमध्ये मराठा संघाची 'रॉयल' कामगिरी; सलग दुसऱ्यांदा जेपेतपदावर कब्जा

अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करायला हरकत नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं कारण, VIDEO

IND vs AFG: शुबमन गिलसमोर अफगाण गोलंदाजी फेल; टीम इंडियाचा पहिल्या वनडेत शानदार विजय

Yavatmal Crime: खासगी रुग्णालयात धारदार शस्त्राने हल्ला करत नर्सची हत्या; यवतमाळ हादरलं

वीज मीटर ४८ तासांत बदलणार; 'महावितरण'कडून ग्राहकांना अल्टिमेटम? काय आहे मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT