भाजपने मध्य प्रदेश,राजस्थान राज्यानंतर आता छत्तीसगड विधानसभेच्या ६४ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. आदिवासी बहुल असलेल्या राज्यात विधानसभेच्या एकूण ९० जागा आहेत. भाजपने जाहीर केलेल्या दुसऱ्या उमेदवारांच्या यादीत एका माजी मुख्यमंत्र्यासहित तीन खासदारांचा सामावेश आहे. (Latest Marathi News)
भाजपने छत्तीसगड विधानसभेच्या ६४ जणांच्या यादीत माजी मुख्यमंत्री डॉ. रमन सिंह यांना राजनांदगाव येथून उमेदवारी देण्यात आली आहे. छत्तीसगडचे भाजप प्रदेशाध्यक्ष अरुण साव यांना लोरमी येथून उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच भाजपचे तीन खासदार छत्तीसगडमधून मैदानात उतरणार आहेत.
भाजपने अद्याप छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर केलेला नाही. मात्र, छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी रमन सिंह यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. रमन सिंह यांनी १५ वर्ष छत्तीसगडचं मुख्यमंत्रिपद सांभाळलं आहे. तसेच भाजपने मध्यप्रदेश आणि राजस्थानप्रमाणे छत्तीसगडमध्येही बडे नेते आणि खासदारांना विधानसभेच्या निवडणुकीत मैदानात उतरवलं आहे.
भाजपने मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील रणनीती छत्तीसगडमध्ये कायम ठेवल्याचं दिसून येत आहे. भाजपने मनेंद्रगडमधून श्याम बिहारी जैयस्वाल यांना मैदानात उतरवलं आहे. या व्यतिरिक्त भाजपने मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या विरोधातही उमेदवार घोषित केला आहे. भूपेश बघेल यांच्या विरोधात विजय बघेल यांना उमेदवारी मिळाली आहे. विजय बघेल हे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे भाचे आहेत.
तत्पूर्वी, केंद्रीय निवडणूक आयोगाने ५ राज्यातील निवडणुकांची घोषणा केली आहे. या राज्यात राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगज, तेलंगणा आणि मिझोरामचा सामावेश आहे. छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यात निवडणूक होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.