Rajasthan Election 2023: राजस्थानमध्ये भाजपची पहिली यादी प्रसिद्ध, 7 खासदारांसह 41 जणांना तिकीट

Rajasthan BJP First list: राजस्थानमध्ये भाजपची पहिली यादी प्रसिद्ध, 7 खासदारांसह 41 जणांना तिकीट
Rajasthan BJP First list
Rajasthan BJP First listSaam Tv
Published On

Rajasthan Assembly Election 2023:

राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने (भाजप) पहिली यादी जाहीर केली आहे. भाजपने अनेक खासदारांसह 41 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. भाजपने राज्यवर्धन राठोड, बाबा बालकनाथ, किरोरी लाल मीन, दिया कुमारी, देवजी पटेल यांच्यासह अनेक खासदारांना तिकीट देत विधानसभा निवणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे.

मोदी सरकारमध्ये मंत्री राहिलेले राज्यवर्धन सिंह राठोड यांना झोटवाडा येथून तिकीट देण्यात आले आहे. विद्यानगरमधून दिया कुमारी यांना रिंगणात उतरवण्यात आले आहे. तसेच बाबा बालकनाथ तिजारा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. हंसराज मीना यांना सपोत्रा ​​आणि किरोरी लाल मीना यांना सवाई माधोपूरमधून तिकीट देण्यात आले आहे.

Rajasthan BJP First list
Dasara Melava: ठाकरे की शिंदे; शिवाजी पार्कवर यंदा कोणाची होणार सभा? BMC ने सांगितलं...

जयदीप बिहाणी यांना गंगानगरमधून तिकीट देण्यात आले आहे. संजीव बेनिवाल यांना भद्रा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. ताराचंद सारस्वत यांना डुंगरगडमधून उमेदवारी देण्यात आली आहे. संतोष मेघवाल यांना सुजानगड (एसी), बबलू चौधरी यांना झुंझुनू येथून तिकीट देण्यात आले आहे. नवलगढमधून विक्रम सिंह जाखल यांना तिकीट देण्यात आले आहे. उदयपुरवतीमधून सुभखरण चौधरी, फतेहपूरमधून श्रावण चौधरी, लक्ष्मणगढमधून सुभाष मेहरिया, दंता रामगडमधून गजानंद कुमावत, कोटपुतलीमधून हंसराज पटेल गुर्जर, दुडू (एसी) प्रेमचंद बैरवा यांना तिकीट देण्यात आले आहे. (Latest Marathi News)

Rajasthan BJP First list
CWC Meeting: काँग्रेस शासित राज्यांमध्ये जातनिहाय जनगणना होणार, राहुल गांधींची घोषणा

दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यांच्या निवडणुकीची घोषणा केली आहे. यात राजस्थानसह मध्य प्रदेश छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोरामचा समावेश आहे. राजस्थानशिवाय मध्य प्रदेश, तेलंगणा आणि मिझोराममध्ये एका टप्प्यात निवडणूक पार पडणार आहे. तर छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यात निवडणूक पार पडणार.

राजस्थानमध्ये २३ नोव्हेंबर, तसेच मध्य प्रदेशमध्ये १७ नोव्हेंबर, तेलंगणामध्ये ३० नोव्हेंबरला आणि मिझोराममध्ये ७ नोव्हेंबर रोजी मतदान पार पडेल. पाचही राज्यांची एकाच दिवशी म्हणजे ३ डिसेंबर रोजी मतमोजणी पार पडेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com