उत्तर प्रदेशच्या ग्वालियरमध्ये एका महिलेने दिराच्या मदतीने सासऱ्याच्या विरोधात पोलिसांत खोटी तक्रार दाखल करण्यास धाव घेतली. महिलेच्या तक्रार करण्याच्या मागणीनंतर पोलिसांना तपासात आरोपींच्या विरोधात एकही पुरावा सापडला नाही. त्यानंतर तक्रारकर्त्या महिलेने रडत रडत सासू-सासऱ्याचे पाय धरून माफी मागितली. (Latest Marathi News)
'आज तक'च्या वृत्तानुसार, उत्तर प्रदेशच्या ग्रामीण भागातील हस्तिनापूरमधील ही घटना आहे. सीता असे या महिलेचे नाव आहे. या महिलेच्या पतीचा मृत्यू झाला आहे. ही महिला दिराच्या मदतीने पोलिसांत पोहोचली. पोलीस स्थानकात पोहोचून सासू आणि सासऱ्या विरोधात फसवणुकीची तक्रार दाखल करण्याची मागणी केली.
महिलेने सासू-सासऱ्या्विरोधात पतीच्या वाटणीची जमीन विकणे आणि शिवीगाळ करून घरातून हाकलून दिल्याची तक्रार दाखल करण्याची मागणी केली.
महिलेने पोलिसांत फसवणुकीची तक्रार दाखल करण्याची मागणी केल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी सत्य जाणून घेण्यासाठी तपास सुरु केला. पोलिसांना तपासादरम्यान काही वेगळंच सत्य समोर आलं. त्यानंतर पोलिसांनी त्यांची समोरासमोर बैठक आयोजित केली.
बैठकीत विधवा महिला, तिचा दिर आणि सासू-सासरे हजर होते. महिलेच्या सासऱ्याने जमीन विकून मिळालेली रक्कम दाखवली. तसेच संपूर्ण हिशोब दिला. त्यानंतर सूनेने सासू-सासऱ्यांचा सांभाळ आणि त्यांची देखभाल करण्याची तयारी दर्शवली. यानंतर सून आणि मुलाने पाय पकडून माफी मागितली.
सून आणि मुलाने आदर राखणे आणि त्यांचा व्यवस्थित सांभाळ करण्याची शपथ घेतली. भांडण मिटल्याने सून, मुलगा आणि सासू-सासऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळालं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.