

हमास या दहशतवादी संघटना आणि इस्राइलमध्ये युद्ध सुरू आहे. या संघर्षात दोन्ही बाजूंनी आतापर्यंत १ हजार पेक्षा अधिक बळी गेले आहेत. इस्राइलमध्ये आतापर्यंत ७०० हून अधिक लोकांचा मृत्यू झालाय. दुसरीकडे, गाझा पट्टीमध्ये ४००हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. परंतु या दोघांकडे असलेल्या ताकदीची तुलना करता येणं शक्य नाहीये. हमास ही दहशतवादी संघटना आहे. तर इस्राइलकडे लष्कर आणि मोसाद ही गुप्तचर संघटना आहे. (Latest News)
याचा त्यांना अभिमान आहे. परंतु हमासनं त्यांच्या नाकीनऊ आणलंय. अशा या दहशवादी संघटनेकडे कोण-कोणते शस्त्र आहेत, याची कल्पना नाहीये. हमासने वायूमार्ग, जलमार्ग, हवाई मार्ग या तिन्ही पद्धतनीं इस्राइलवर आक्रमण केलं आहे. बलाढ्य असलेल्या इस्राइलने हमासच्या कारवायाकडे दुर्लक्ष केलं.
हमासकडे कोणती शस्त्रे आहेत?
हमासकडून करण्यात आलेला हल्ला हा योग्य सुनियोजितपणे करण्यात आलाय. या हल्ल्यात हमासनं नवीन तंत्रज्ञानवाले शस्त्रांचा वापर केलाय. इस्राइलमध्ये जाण्यासाठी हमासकडून ग्लायडरचा उपयोग केला जातोय. इस्राइलच्या सर्वात सुरक्षित टॅंक मर्कवा आयव्हीचा नाटनाट करण्यासाठी हमासानं पहिल्यांदा ड्रोनचा उपयोग केलाय. हमासकडे असलेल्या रॉकेटची क्षमता ही किमीपर्यंतचा आहे. हे रॉकेट तेल अवीवपर्यंत पोहचण्याची क्षमता या रॉकेटमध्ये आहे.
हमासने समुद्रामार्गे इस्राइलमध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न केला. यातील अनेक जहाजांना इस्राइलने अडवलं. हमासनं अल- कसम ब्रिगेड, सैन्य बटालियनमध्ये याचा उपयोग केला. यावेळी हमासने इस्राइलच्या नागरिकांना बंदी बनवत हल्ला केला. दरम्यान इस्राइलकडे जगातील सर्वात उत्कृष्ट गुप्तचर यंत्रणा आहे. परंतु आता इस्राइलला युद्ध कौशल्य वापरत हमासचा आक्रमण हाणून पाडावे लागेल. इस्त्राइलची वायुसेना तांत्रिकदृष्ट्या प्रगत आहे. जगात अशी वायुसेना कोणाकडे नाहीये.
एफ- ३५ स्टील्थ फायटर जेट
इस्त्राइलकडे आधुनिक बॉम्ब आहेत. तसेच आधुनिक नेटवर्क नियंत्रित करणारी एक यंत्रणा आहे. या यंत्रणेद्वारे लक्ष्याला टार्गेटला अजून हेरतत असतं. इस्राइलकडे ५०० मर्कवा टॅंक आहे. हे टँक मिसाईल किंवा ड्रोनचा हल्ला परतून लावण्यास सक्षम आहे. इस्त्राइलकडे एक परमाणू आहे. परंतु याचा वापर अजून करण्यात येणार नाहीये. जर युद्ध शिगेला पोहोचले तर इस्त्राइल त्याचा उपयोग करेल यात शंका नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.