PM Modi, Amit Shah  Saam Tv
देश विदेश

BJP Donation: भाजपला २२४४ कोटींची देणगी, काँग्रेस तिसऱ्या स्थानी, कोणत्या पक्षाला किती रक्कम मिळाली?

political parties donation : २०३०२४ वर्षांमध्ये कोणत्या पक्षाला किती डोनेशन मिळाले, याबाबतची माहिती समोर आली आहे. भाजपच्या देणगीमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसतेय. यामध्ये काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर आहे.

Namdeo Kumbhar

BJP Donation: लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवत भाजप तिसऱ्यांदा सत्तेत आलेय. त्यासोबतच भाजपसाठी आणखी एक जमेची बाजू म्हणजे, २०२३-२४ या वर्षात भाजपला सर्वाधिक देणगी मिळाली आहे. गतवर्षी पेक्षा तीनपट अधीक देणगी भाजपला मिळाल्याचे आकड्यातून समोर आलेय. या यादीत काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर (BJP and Congress electoral bond contributions 2023-24) आहे. गतवरि्षीपेक्षा काँग्रेसला तीनपट जास्त देणग्या मिळाल्या आहेत. पण भाजपापेक्षा खपूच कमी आहे.

२०२३-२४ या वर्षांमध्ये भाजपला एखादी व्यक्ती, ट्रस्ट आणि कॉर्पोरेट हाऊस यांच्याकडून २०,००० रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या देणग्या मिळाल्या आहेत. भाजपल मिळालेल्या देणगीची एकूण रक्कम २,२४४ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. ही रक्कम गतवर्षीच्या तुलनेत तीनपट जास्त आहे. दुसरीकडे या यादीत काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर आहे. काँग्रेसला २०२३-२४ मध्ये २८८.९ कोटी रुपयांची देणगी मिळाली. गतवर्षी काँग्रेसला ७९.९ कोटी रुपयांची देणगी मिळाली होती.

२०२३-२४ मध्ये राजकीय पक्षांना मिळेलेल्या देणगीची माहिती निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. प्रुडंट इलेक्टोरल ट्रस्टकडून (Prudent Electoral Trust) भाजपला ७२३.६ कोटी रुपयांची देणगी मिळाली तर काँग्रेसला १५६.४ कोटी रुपयांची देणगी मिळाली. काँग्रेस आणि भाजपला देणगी देणाऱ्यांमध्ये प्रुडंट इलेक्टोरल ट्रस्ट आघाडीवर आहे. मेघा एन्जिनिअरिंग & इन्फ्रा लिमिटेड, सिअरम इन्स्टिट्यूट, आर्सेलर मित्तल ग्रुप आणि भारती एअरटेल हे २०२३-२३ मध्ये देणगी देण्यामध्ये आघाडीवर होते.

निवडणूक रोखेमधून मिळालेल्या देणग्या भाजप आणि काँग्रेसच्या देणगीच्या आकड्यांत समाविष्ट नहीत. कारण, नियमांनुसार राजकीय पक्षांनी हे तपशील फक्त त्यांच्या वार्षिक लेखापरीक्षण अहवालांत जाहीर करायचे असतात. फेब्रुवारी २०२४ मध्ये सुप्रीम कोर्टाने निवडणूक रोखेची पद्धत रद्द केली. त्यामुळे राजकीय पक्षांसाठी निधी मिळवण्याचे प्रमुख स्रोत हे निवडणूक ट्रस्ट मार्गाने किंवा थेट मिळालेल्या देणग्या झालेय.

२०२३-२४ मध्ये इलॉक्ट्रोल बाँडमधून मिळालेल्या देणग्या काही प्रादेशिक पक्षांनी जाहीर केल्या आहेत. यामध्ये बीआरएसचा समावेश आहे. बीआरएसला ४९५.५ कोटी रुपये इलॉक्ट्रोल बाँडमधून मिळाले आहेत. DMK ला ६० कोटी रुपये आणि YSR काँग्रेसला १२१.५ कोटी रुपये मिळाले आहेत. JMM ने ११.५ कोटी रुपये मिळाल्याचे जाहीर केलेय. पण त्याच्या इतर देणग्या फक्त ६४ लाख रुपयांच्या वर होत्या.

२०२३-२४ मध्ये भाजपच्या देणग्यामध्ये २१२ टक्क्यांनी वाढ झाली. २०१९ मध्ये सार्वत्रिक निवडणुकीच्या आधी भाजपने ७४२ कोटी रुपयांची देणग्या जाहीर केली होती, तर काँग्रेसने १४६.८ कोटी रुपये मिळाल्याचे सांगितले होते. २०२३-२४ मध्ये भाजपला निवडणूक ट्रस्टच्या माध्यमातून ८५० कोटी रुपये मिळाले, ज्यामध्ये ७२३ कोटी रुपये प्रुडंट इलेक्टोरल ट्रस्टकडून आले आहेत. तर १२७ कोटी रुपये ट्रायम्फ इलेक्टोरल ट्रस्टकडून आणि १७.२ लाख रुपये Einzigarting इलेक्टोरल ट्रस्टकडून आले आहेत. काँग्रेसला ट्रस्ट मार्गाने १५६ कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळाली आहे, त्यामध्ये प्रुडंटच एकमेव देणगी देणारा आहे. प्रुडंटने २०२३-२४ मध्ये BRS आणि YSR काँग्रेसला अनुक्रमे ८५ कोटी रुपये आणि ६२.५ कोटी रुपये देणगी दिली आहे. आंध्र प्रदेशात सध्या सत्ताधारी असलेल्या TDP ला प्रुडंटकडून ३३ कोटी रुपये देण्यात आलेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT