vinod tawde 
देश विदेश

विनाेद तावडेंवर भाजपाने साेपवली माेठी जबाबदारी; चाैघांना संधी

भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी या नियुक्त्या केल्या आणि पक्षाचे सरचिटणीस अरुण सिंग यांनी अधिकृत निवेदनाद्वारे त्यांची घोषणा केली.

साम न्यूज नेटवर्क

सातारा : भारतीय जनता पक्षाने (BJP) राष्ट्रीय स्तरावर आज काही नेत्यांच्या नियुक्त्या केल्या आहे. त्यामध्ये महाराष्ट्राचे माजी शालेय शिक्षण व क्रीडा मंत्री विनोद तावडे (vinod tawde) यांच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदाची जबाबदारी साेपविण्यात आली आहे. भूपेंद्र यादव केंद्रीय मंत्री झाल्यानंतर निर्माण झालेली रिक्त जागेवर भाजपचे राष्ट्रीय सचिव असलेले तावडे यांची सरचिटणीसपदी वर्णी लागलेली आहे.

भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा (J.P. Nadda) यांनी या नियुक्त्या केल्या आणि पक्षाचे सरचिटणीस अरुण सिंग यांनी अधिकृत निवेदनाद्वारे त्यांची घोषणा केली.

विनाेद तावडे यांच्याबराेबरच ऋतुराज सिन्हा (बिहार), आशा लाकडा (झारखंड) यांची राष्ट्रीय सचिव तसेच माजी आयपीआस अधिकारी भारती घाेष (पश्चिम बंगाल), शहजाद पूनावाला यांची राष्ट्रीय प्रवक्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

उत्तर प्रदेश, पंजाब आणि उत्तराखंडसह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांपूर्वी या नियुक्त्या झाल्याने संघटना आणखी मजबूत होईल असा विश्वास पक्षातील कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत. तावडे यांच्या नियुक्तीमुळे मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप कार्यकर्त्यांना आणखी बळ मिळणार असल्याची चर्चा रंगली आहे.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : सांगलीत एका नवविवाहितेची सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या

Box Office Collection : ऋषभ शेट्टीचा 'कांतारा' 300 कोटींच्या उंबरठ्यावर, तर वरुणच्या 'सनी संस्कारी' चित्रपटाच्या कमाईत सोमवारी घसरण

Viral Wedding Story : बिर्याणी अन् तळलेल्या माश्यामुळे लग्नात हाणामारी; नवऱ्याने मोडलं लग्न तर वधू पक्षाने बोलवलं पोलिसांना

Akola : धक्कादायक प्रकार; अकोला शासकीय रुग्णालय आवारातील लॉनवर अश्लील चाळे

दिवाळीच्या तोंडावर सोनं महागलं, १० तोळं सोन्यासाठी किती मोजावे लागणार? पाहा लेटेस्ट दर

SCROLL FOR NEXT