Actor Vijay’s party TVK is reportedly in talks with BJP for a possible alliance ahead of the Tamil Nadu Assembly elections. Saam Tv
देश विदेश

राजकारणात उलथापालथ होणार; भाजपची सुपरस्टार अभिनेत्याला उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर

Vijay Thalapathy Political Entry Impact In Tamil Nadu: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि अभिनेता विजय यांच्या तमिलगा वेत्री कझगम पक्षामध्ये युतीची चर्चा रंगली आहे.

Omkar Sonawane

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजप आणि अभिनेता विजय थलपती यांचा पक्ष, तमिलगा वेत्री कझगम (टीव्हीके) विधानसभा निवडणूक एकत्र लढवू शकतात अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. दोन्ही पक्षांमधील वाटाघाटी अंतिम टप्प्यात पोहोचल्या आहेत. भाजप सूत्रांनुसार, युतीने निवडणूक जिंकल्यास पक्षाने विजय यांना उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली आहे. प्रस्तावित जागावाटपाचा एक भाग म्हणून, भाजपने टीव्हीके यांना अंदाजे ८० जागा देऊ केल्या आहेत. जर ही युती झाली तर राज्यातील निवडणुकीमध्ये वेगळे चित्र दिसू शकते.

Will actor Vijay become Deputy Chief Minister

मात्र विजय अजूनही मुख्यमंत्री पदावर दावा करत असल्याने वाटाघाटींमध्ये हा मुद्दा अडचणीचा ठरू शकतो. भाजप अभिनेता विजय आणि त्यांच्या पक्षाला एनडीएमध्ये घेण्यासाठी सतत प्रयत्न करत आहे. सक्रिय राजकारणात प्रवेश केल्यापासून त्यांचा पक्ष, तमिलगा वेत्री कझगमने मोठी लोकप्रियता मिळवली आहे.

भाजप आणि टीव्हीके यांच्यातील युती घडवून आणणारी व्यक्ती दुसऱ्या राज्याचे उपमुख्यमंत्री असल्याचे सांगितले जात आहे. ही युती करण्यासाठी ते मध्यस्थी असल्याचे बोलले जात आहे. भाजप विजयला सोबत घेण्याचे मुख्य कारण म्हणजे त्याची असलेली फॅन फॉलोविंग, पक्षाच्या रणनीतीकारांचा असा विश्वास आहे की या पाठिंब्याचा एक छोटासा भाग देखील निवडणुकीच्या निकालावर मोठा परिणाम करू शकतो.

दरम्यान, टीव्हीके अध्यक्ष विजय दिल्लीत पोहोचले आहेत . मात्र भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष के. अन्नामलाई म्हणाले की, तामिळनाडूमध्ये जिंकण्यासाठी एनडीएला कोणत्याही पक्षाची आवश्यकता नाही. एनडीए मजबूत आहे आणि युतीमध्ये कोणत्याही पक्षाची अपेक्षा करत नाही. १७ मार्च रोजी द्रमुक सरकारविरुद्ध होणारा निषेध हा पुरावा आहे की आम्ही मजबूत आणि एकजूट आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन वेळा आले आहेत आणि निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आणखी दोन-तीन वेळा येतील. आम्ही आमच्या स्वतःच्या मार्गावर आहोत. असे अन्नामलाई म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Summer Season Daily Wear Saree: उन्हाळ्याच्या डेली युजसाठी कोणत्या साड्या बेस्ट?

Maharashtra Live News Update: लातूर - तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर विचित्र अपघात, ३ जणांचा मृत्यू

Gudi Padwa 2026 : सणासुदीला घाईगडबडीत फक्त ५ मिनिटांत करा मेकअप, 'या' ३ स्टेप्समध्ये चेहरा दिसेल उजळ

इराणच्या हल्ल्यात इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंचा मृत्यू? त्या व्हिडिओनंतर जगभरात खळबळ; नेमकं काय आहे सत्य?

Pune Crime: इफ्तार पार्टीदरम्यान रक्तरंजित थरार, तरुणांवर कोयत्याने सपासप वार; ५ जण गंभीर जखमी, पुण्यात खळबळ

SCROLL FOR NEXT