BJP MP Ramesh Bidhuri Saam TV
देश विदेश

BJP MP Ramesh Bidhuri : भाजप खासदाराने संसदेत बसपा खासदाराला बोलताना पातळी सोडली, राजनाथ सिंह यांच्याकडून खेद व्यक्त

Political News : रमेश बिधुरी यांनी काही आक्षेपार्ह म्हटले असेल तर ते रेकॉर्डमधून काढून टाकावे, असं राजनाथ सिंह यांंनी म्हटलं आहे.

प्रविण वाकचौरे

BJP MP Ramesh Bidhuri :

भारतीय जनता पक्षाचे खासदार रमेश बिधुरी यांनी लोकसभेत बहुजन समाज पक्षाचे (बसपा) खासदार दानिश अली यांच्याबाबत अपशब्द वापरले आहेत. चांद्रयान-3 वर बोलताना भाजप खासदाराने अत्यंत आक्षेपार्ह आणि असंसदीय शब्द वापरले.

केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना रमेश बिधुरी यांच्या वक्तव्याबद्दल खेद व्यक्त करावा लागला आहे. रमेश बिधुरी यांनी काही आक्षेपार्ह म्हटले असेल तर ते रेकॉर्डमधून काढून टाकावे आणि मी याबद्दल खेद व्यक्त करतो, असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

लोकसभेत असंसदीय भाषेचा वापर करताना, भाजप खासदार रमेश बिधुरी यांनी बसपा खासदार दानिश अली यांच्याविरोधात शिवीगाळ आणि अपशब्द वापरले. विरोधी पक्षांच्या खासदारांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये भाजप खासदार बिधुरी यांनी बसपा खासदाराला उद्देशून शिवीगाळ आणि अत्यंत आक्षेपार्ह भाषा वापरल्याचे स्पष्ट होते. (Political News)

रमेश बिधुरी यांनी खासदार दानिश अली यांना दहशतवादी संबोधले. रमेश बिधुरी यांनी वापरलेल्या भाषेवर विरोधकांनी आक्षेप घेतला. धक्कादायक म्हणजे भाजपचे माजी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन हे लोकसभेत रमेश बिधुरी यांच्या अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्यावर मागे हसताना दिसले.  (Latest Marathi News)

काँग्रेस नेते पवन खेरा यांनी टीका करत म्हटलं की, "मी रमेश बिधुरी यांना दिल्ली विधानसभेत आमदार म्हणून पाहिले आहे. त्या दिवसांत ते बरे होते. मला वाटते, संसदेत त्यांचे पालनपोषण मोदी-शहा यांनी समर्थपणे केले आहे. नवीन संसद. नवीन भारत."

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Most Relaxing Places: धकाधकीच्या जीवनापासून सुटका हवीय तर 'या' शांत ठिकाणांना द्या भेट

Yugendra Pawar News : बारामतीत युगेंद्र पवारांची सांगता सभा, प्रचाराच्या तोफा थंडावल्या

Vinesh Phogat: आम्ही तेव्हाच सेफ राहू जेव्हा तुमचे नेते महिला अत्याचार थांबवतील, विनेश फोगाट यांचा भाजपवर निशाणा

Washim Vidhan Sabha : वाशिम विधानसभा मतदारसंघात बंडखोर उमेदवाराचा भाजपात प्रवेश; महायुतीला होणार फायदा

Ajit Pawar Speech : अजित पवारांनी जाहीर कबुल केलं; बारामतीकरांसमोर चूक मान्य करत म्हणाले...VIDEO

SCROLL FOR NEXT