Bihar BJP MP Pradeep Kumar Singh ANI
देश विदेश

Political News : महाराष्ट्रानंतर 'या' राज्यात मोठा राजकीय भूकंप होणार; भाजप नेत्याचा गौप्यस्फोट

भाजपा खासदार प्रदीप कुमार सिंह यांनी एक मोठं विधान केलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : महाराष्ट्रातील महाविकासआघाडी सरकारवरून जसा आमदार-खासदारांचा विश्वास उडाला तसाच बिहारमध्येही नितीश कुमार यांच्या सरकारवरील आमदार-खासदारांचा विश्वास उडाला आहे. आगामी काळात त्यांचे आमदार आणि खासदार पक्ष सोडून भाजपमध्ये येतील, असं मोठं विधान भाजपचे खासदार प्रदीप कुमार सिंह यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

बिहारमध्ये सध्या रामचरितमानसवरून राजकीय लढाई (Political News) सुरू आहे. या मुद्द्यावरून भाजपने महाआघाडीला चांगलंच धारेवर धरलं आहे. एकीकडे दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असताना, भाजप नेत्याने बिहारमध्ये महाराष्ट्रासारखा राजकीय भूकंप येईल, असं विधान केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

नेमकं काय म्हणाले प्रदीप कुमार सिंह?

बिहारमध्ये सुरू असलेल्या राजकीय वादावर भाजप (BJP) खासदार प्रदीप कुमार सिंह यांनी सोमवारी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी महाआघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. प्रदीप कुमार म्हणाले, 'महाराष्ट्रातील महाविकासआघाडी सरकारवरून जसा आमदार-खासदारांचा विश्वास उडाला तसाच बिहारमध्येही नितीश कुमार यांच्या सरकारवरील आमदार-खासदारांचा विश्वास उडाला आहे. आगामी काळात त्यांचे आमदार आणि खासदार पक्ष सोडून भाजपमध्ये येतील'.

पुढे बोलताना प्रदीप कुमार सिंह म्हणाले, 'नितीशकुमार वगळता भाजपचे दरवाजे सर्वांसाठी खुले आहेत. नितीश कुमार यांची कोणतीही ओळख उरली नाही, त्यांच्यासाठी भाजपात येण्याची दारं बंद झाली आहेत. बाकीच्यांसाठी ती उघडी असून लवकरच त्यांचे आमदार-खासदार पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश करतील'.

नितीश कुमार वगळता जेडीयूचे सर्व नेते भाजपशी हातमिळवणी करण्यास तयार आहेत, असा दावा अररियाच्या खासदाराने केला. आतली गोष्ट सांगतोय, असं प्रदीप सिंह म्हणाले. हे मी पूर्ण आत्मविश्वासाने सांगत आहे. थोडा वेळ थांबा बिहारमध्ये महाराष्ट्रासारखा खेळ खेळला जाईल. मात्र, त्यांच्या वक्तव्यावर विरोधी पक्षनेत्यांची प्रतिक्रिया येणे बाकी आहे. विशेष म्हणजे, जेडीयूने काही महिन्यांपूर्वी भाजपसोबतची निवडणूकपूर्व युती तोडली आणि आरजेडीसोबत सरकार स्थापन केले.

बिहारमध्ये सध्या नितीश कुमार यांच्या नेतृत्वात महाआघाडीचे सरकार आहे. ऑक्टोबर 2022 मध्ये नितीश कुमार यांनी भाजपसोबतची युती तोडून जदयू आणि राजद यांच्यासह मित्र पक्षांचं सरकार स्थापन केलं आहे. नितीश कुमार यांनी भाजपचा जदयूला फोडण्याचा डाव असल्याचा आरोप करत एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. भाजप मित्रपक्षांना संपवत असल्याचा आरोप देखील त्यांच्याकडून करण्यात आला होता.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maratha-OBC Quota Row: ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंविरोधात पोलिसात तक्रार दाखल; काय आहे कारण?

Chandra Grahan Tips : ग्रहणाच्या वेळी अन्न दूषित होऊ नये यासाठी सोपा उपाय

Anant Chaturdashi 2025 live updates : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मिरवणूक रथात विराजमान

Viral Video: शाळा आहे की मसाज पार्लर! शिक्षकाने विद्यार्थिनींकडून करून घेतली बॉडी मसाज, VIDEO पाहून तुम्हालाही येईल राग

Aayush Komkar: शेवटी सूड घेतलाच! वनराजच्या अंत्यविधीला शस्त्रपूजन करत बदला घेण्याची शपथ, अन् १ वर्षाने आयुष कोमकरची हत्या

SCROLL FOR NEXT