PM Awas Yojna Viral Video X Twitter
देश विदेश

PM Awas Yojna : भाजप खासदाराने विचारलं घर मिळालं, कुणी पैसे घेतले का? महिलेने दिलेले उत्तर होतंय व्हायरल

PM Awas Yojna Viral Video : पीएम आवासविषयी विचारण्यात आलेल्या प्रश्नावर युपीमधील महिलेले दिलेलं उत्तर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भाजप खासदाराने महिलेला पीएम आवासासाठी कोणाला पैसे दिले का असा प्रश्न केला होता.

Bharat Jadhav

PM Awas Yojna woman answer Video Viral :

लोकसभेच्या तयारीसाठी भाजपने देशभरातील राज्यात 'विकसित भारत संकल्प यात्रा' सुरू केलीय. आज 'विकसित भारत संकल्प यात्रा' उत्तर प्रदेशातील बरेली येथील पोहोचली होती. या कार्यक्रमात भाजप पदाधिकारी आणि शासकीय कर्मचारी सहभागी झाले होते. भाजप खासदार पीएम आवास योजनेचे लाभार्थ्यांना प्रतिकात्मक घराची चावी देत होते. (Latest News)

याच कार्यक्रममधील एका महिलेचा (woman) व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, भाजप खासदाराने या वृद्ध महिलेला पीएम आवास योजनेंतर्गत घराची चावी देत आहेत. त्यावेळी त्यांनी या महिलेला प्रश्न केला. घरासाठी त्यांनी कोणाला पैसे दिले का? असा प्रश्न केला. त्यावर महिलेलं दिलेल्या उत्तरामुळे प्रशासकीय कर्मचाऱ्यांच्या पायाखालील जमिनी सरकली. या महिलेचं उत्तर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हिडिओमध्ये भाजपचे खासदार ( BJP MP) धर्मेंद्र कश्यप दिसत आहेत, त्यांनी एका वृद्ध महिलेला प्रश्न करताना दिसत आहेत. घर मिळाल्यानंतर कसं वाटत आहे, त्यावर ती महिला म्हणते चांगलं वाटतं. त्यानंतर खासदार कश्यप यांनी परत एक प्रश्न केला. महिलेला घराची चवी देताना कश्यप म्हणाले, पीएम आवास योजनेसाठी कोणाला पैसे किंवा कोणाला लाच दिली का? हो, ३० हजार रुपये दिल्याचं उत्तर त्या महिलेने दिलं. महिलेचं उत्तर ऐकून खासदार आणि इतर पदाधिकारी हसू लागले.

परंतु प्रशासकीय कर्मचाऱ्यांच्या पायाखाली जमीन सरकली. वृद्ध महिलेने उत्तर दिल्यानंतर खासदारांना सरकारी कर्मचाऱ्यांना इशारा दिला. हा गंभीर प्रकार असल्याचं म्हणत त्यांनी महिलेला विचारलं की, कोणत्या सरकारी कर्मचाऱ्यांनी पैसे घेतल त्याचं नाव द्यावं. दरम्यान जिल्हा अधिकाऱ्यांनी या घटनेची गंभीर दखल घेतलीय. ही बाब माझ्या निदर्शनास आली असून या प्रकरणाचा तपास अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी प्रशासन व्ही. के. सिंह यांच्याकडे सोपवण्यात आलाय, असे बदायू जिल्हा दंडाधिकारी मनोज कुमार यांनी म्हटले आहे.

दरम्यान सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. नम्रपणे मान्यवरांची तक्रार केली. नागरिकांचा इतका साधेपणा नम्रपणा चांगला नसल्याचं एका युझरने म्हटलं आहे. तर दुसऱ्या युझरने म्हटलं की, भाजपची डबल इंजिन सरकार गरिबांकडून पैसे उकाळते. मोदी जी पाहिलं का काय होतंय ते, कुठे आहे तुमची गॅरंटी? पीएम आवास योजनेनेसाठी लाच घेणाऱ्यांना कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, असं एका युझरने म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunil Shelke: महाराष्ट्रातील आमदारांच्या हत्त्येचा कट?आमदाराला संपवण्याचा डाव कुणाचा?

Wardha News : धावत्या दुचाकीवर वीज कोसळली; मुलासह वडिलांचा करुण अंत, पुतण्याची मृत्यूशी झुंज

Modi Government: मोदी देणार विद्यार्थ्यांना 1 कोटी? आयडिया देणारा होणार मालामाल?

Mumbai Police : एसीबीची मोठी कारवाई; मुंबई पोलीस दलातील २ बड्या अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडलं

Chhagan Bhujbal: आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापणार, ओबीसींसाठी भुजबळांचा एल्गार

SCROLL FOR NEXT