BJP MLA Raja Singh Arrested/ANI SAAM TV
देश विदेश

भाजप आमदाराला अटक; पैगंबर मोहम्मद यांच्याबद्दल केलं होतं वादग्रस्त वक्तव्य

भाजप आमदार राजा सिंह हे वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात.

साम ब्युरो

BJP MLA Raja Singh Arrested| हैदराबाद: तेलंगणाचे भाजप आमदार राजा सिंह यांना पोलिसांनी अटक केली आहे. पैगंबर मोहम्मद यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्यानं राजा सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहणारे सिंह हे यावेळी अडचणीत सापडले आहेत.

राजा सिंह यांच्याविरोधात कलम २९५ (ए), १५३ (ए) आणि अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. हैदराबादचे डीसीपी (दक्षिण विभाग) पी साई चैतन्य यांनी याबाबत माहिती दिली. दुसरीकडे, राजा सिंह यांच्याविरोधात मुस्लीम समाजातील विविध संघटनांनी आंदोलन (Protest) केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी काही जणांना ताब्यातही घेतले आहे.

राजा सिंह यांनी स्टँडअप कॉमेडियन मुन्नवर फारुखीचा हैदराबादमधील कार्यक्रम रोखण्याचा बराच प्रयत्न केला होता. मात्र, तेलंगणा पोलिसांच्या (Police) कडेकोट सुरक्षेनंतर हा कार्यक्रम झाला.

त्यानंतर राजा सिंह हे संतापले होते. त्यांनी मुन्नवर फारुखी आणि समाजाच्या विरोधात वादग्रस्त टिप्पणी करणारा व्हिडिओ शेअर केला. त्यात शिवीगाळही करण्यात आली होती. हा वादग्रस्त व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संताप व्यक्त करण्यात येत होता.

मुस्लीम समाजातील काही संघटनांनी रस्त्यावर उतरून राजा सिंह यांच्याविरोधात आंदोलन केले. अनेक पोलीस ठाण्यांमध्ये राजा सिंह यांच्याविरोधात तक्रारी दाखल केल्या. तसेच राजा सिंह यांना अटक करण्याची मागणी केली. शहराच्या पोलीस आयुक्तांच्या कार्यालयासमोर ठिय्या मांडण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Two New Airlines:नव्या दोन एअरलाईन्सची विमानं आकाशात भरणार उड्डाण; केंद्र सरकारची मंजुरी

'हिंदूंनो 4 मुलं जन्माला घाला'; राणांचा सल्ला, विरोधकांचा हल्ला, VIDEO

Maharashtra Politics : भाजपला रोखण्यासाठी पवार काका-पुतण्या एकत्र? सुप्रिया सुळेंनी दिले सूचक संकेत

BMC Election : शिंदेंना हव्यात तिजोरीच्या चाव्या; BMCसाठी भाजप-शिंदेसेनेमधला पेच कायम, VIDEO

Actor Sayaji Shinde: अभिनेते सयाजी शिंदेंनी उभारलेल्या देवराईला अचानक आग

SCROLL FOR NEXT