अफजल खान वध देखावा प्रकरणावरून दानवेंचा हल्लाबोल; म्हणाले, हे कुठलं हिंदुत्वाचं सरकार...

'शिवसेना संपवण्याचा डाव भाजपचा आहे, भाजपचा तो छुपा अजेंडा होता आता ते खुलेआम बोलत आहेत.'
Devendra Fadanavis and Eknath Shinde
Devendra Fadanavis and Eknath Shinde Saam TV
Published On

मुंबई: पुण्यातील कोथरूड परिसरातील एका गणेश मंडळाला अफजल खान वध हा ऐतिहासिक जिवंत देखाव्यासाठी परवानगी नाकारली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असं कारण देत हा देखावा साकारण्यास पोलिसांनी (Police) परवानगी नाकारली असली तरी आता या प्रकरणावरुन राज्यभरातील राजकारण चांगलंच तापलं आहे.

या घटनेचे पडसाद राज्याच्या पावसाळी अधिवेशनामध्ये देखील उमटल्याचं पाहायला मिळाले. स्वत:ला हिंदुत्ववादी म्हणवता आणि शिवाजी महाराजांचा (Shivaji maharaj) इतिहास दाखवायला परवानगी देत नसल्याची टीका आता शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde-Fadnavis government) विरोधी पक्षाकडून केली जात आहे.

अशातच आता शिंदे गटाचे कट्टर विरोधक अशी ओळख असणारे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी देखील शिंदे सरकारवर निशाणा साधला. 'शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला, अशा घटनेचा विषय जर हे सरकार विसरत असेल तर मग हे कुठलं हिंदुत्वाचं सरकार, अशी टीका त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली.

पाहा व्हिडीओ -

तसंच शिवसेना संपवण्याचा डाव भाजपचा आहे. भाजपचा हा छुपा अजेंडा होता आता ते खुलेआम बोलत आहेत' असही दानवे यावेळी म्हणाले. तर अफजल खान वध देखाव्याची परवानगी मागितली त्यामध्ये गैर काय आहे? अफजल खानाचा वध छत्रपती शिवाजी महाराजांनी केला हे नाकारण्याचे कारण नाही असं वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) म्हणाले आहेत.

Devendra Fadanavis and Eknath Shinde
अफजल खान वध देखाव्याच्या परवानगीवर ठाकरे गटातील नेते म्हणाले, पुण्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात...

'अफजल खान वध जे हिंदुत्वासाठी आम्हाला सोडून गेले ते चकार शब्द देखील काढत नाहीयेत कोणताही लोकप्रतिनिधी आवाज उठवताना पाहायला मिळत नाही. गोविंदामध्ये अफजलखानाचा वध चित्र दाखवण्याचा प्रयत्न केला होता. मग फक्त गणेशोत्सवातच अफजल खान वधाच्या देखाव्याला बंदी का? तसंच फक्त पुण्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात देखील या देखाव्याला परवानगी दिली जात नसल्याचं शिवसेना नेते सचिन अहिर (Sachin Ahir) म्हणाले आहेत.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com