Political News x
देश विदेश

Politics : निवडणुकीपूर्वी भाजपला धक्का? २ मित्रपक्ष साथ सोडण्याच्या तयारीत, चर्चांना उधाण

Political News : भाजपच्या मिशन बिहारला विधानसभा निवडणुकीपूर्वीच धक्का बसल्याची चर्चा रंगली आहे. जागावाटपामध्ये असंतुष्ट असलेले दोन मित्रपक्ष एनडीएतून बाहेर पडणार असल्याचे म्हटले जात आहे.

Yash Shirke

  • एनडीएमध्ये फूट पडणार असल्याची चर्चा

  • भाजपच्या मिशन बिहारला धक्का बसणार?

  • मित्रपक्ष निवडणुकीपूर्वीच साथ सोडणार?

Bihar Politics : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये जय्यत तयारी सुरु आहे. यादरम्यान सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील मतभेद समोर आले आहेत. जागावाटपाच्या मुद्द्यावरुन भारतीय जनता पक्ष आणि अन्य मित्र पक्षांमध्ये धुसफूस सुरु असल्याची चर्चा रंगली आहे. या चर्चा सुरु असताना मित्रपक्ष असलेल्या हिंदुस्तानी अवाम मोर्चाचे प्रमुख जीतन राम मांझी आणि केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी जागावाटपावरुन सोशल मीडियावर पोस्ट केल्या आहेत. या पोस्टमुळे बिहारमध्ये एनडीएमध्ये फूट पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जीतन राम मांझी यांनी बुधवारी (८ ऑक्टोबर) सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली. त्यात त्यांनी रामधारी सिंह दिनकर यांच्या 'कृष्ण की चेतावनी' या कवितेला जोडून एक कविता लिहिली आहे. या पोस्टवरुन त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केल्याचे म्हटले जात आहे. पक्षाला १५ हून कमी जागा मिळाल्यास आम्ही निवडणूक लढवणार नसल्याचे इशारा दिल्याचे पीटीआयचे वृत्त आहे.

राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये सध्या तणाव पाहायला मिळत आहे. या स्थितीमध्ये केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनीही सोशल मीडिया अकाउंटवरुन सूचक पोस्ट शेअर केली. यात त्यांनी वडिलांचा उल्लेख करताना 'जुर्म करो मत, जुर्म सहो मत। जीना है तो मरना सीखो, कदम-कदम पर लड़ना सीखो' असे म्हटले. राष्ट्रीय लोकशाही आघाडीत मंत्री चिराग पासवान यांनी ३५ जागांची मागणी केली होती. पण भाजपने फक्त २५ जागा देण्याची तयारी दाखवल्याने चिराग पासवान नाराज असल्याची चर्चा रंगली आहे.

निवडणूक आयोगाद्वारे काही दिवसांपूर्वी बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखांबाबत घोषणा करण्यात आली. बिहारमधील विधानसभा निवडणुका या दोन टप्प्यांमध्ये होणार असून ६ नोव्हेंबर रोजी पहिल्या टप्प्यासाठीचे मतदार होणार आहे आणि ११ नोव्हेंबर रोजी दुसऱ्या टप्प्यासाठीचे मतदान पार पडणार आहे. मतदानाचा निकाल हा १४ नोव्हेंबर २०२५ रोजी जाहीर केला जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navi Mumbai Police Bharti: पोलीस होण्याचं स्वप्न होणार पूर्ण; ५२७ कॉन्स्टेबल आणि ड्रायव्हर पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता अन् महत्त्वाच्या तारखा

Maharashtra Live News Update: अलिबाग समुद्रात दोन तरुण बुडले, शोध सुरू

Maharashtra Politics: मोर्चात ठाकरेंची बडवा-बडवीची भाषा, ठाकरेंची एकी, महायुतीला धडकी?

Maharashra News: महाराष्ट्रात येणार केंद्राचं पथक; पूरग्रस्त भागातील नुकसानीची पाहणी करणार

रात्री १२ वाजेनंतर पुरुषांचा मूड का होतो रोमँटिक?

SCROLL FOR NEXT