Draupadi Murmu
Draupadi Murmu  saam tv
देश विदेश

Presidential Election: द्रोपत्ती मुर्मो असणार एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार

साम टिव्ही ब्युरो

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी (President Election 2022) राष्ट्रीय लोकशाही आघाडीने उमेदवाराच्या नावाची घोषणा केली आहे. राष्ट्रपतीपदासाठी द्रोपत्ती मुर्मो हे उमेदवार असणार आहेत. याबाबत भाजपचे(BJP) राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी माहिती दिली. (Presidential Elections 2022 News Update In Marathi )

भारतीय जनता पक्षाने राष्ट्रपती निवडणुकीसाठी उमदेवार जाहीर केला आहे. झारखंडच्या माजी राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपकडून याआधी रामनाथ कोविंद यांना संधी दिली होती. यावेळी भाजपने आदिवासी महिलेला राष्ट्रपतीपदाची उमेदवारी दिली आहे. भाजपचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांना द्रौपदी मुर्मू यांच्या नावाची घोषणा केली. भाजपनं राष्ट्रपतीपदाचा उमेदवार जाहीर करण्याआधी बैठक घेतली होती. त्यानंतर भाजपने राष्ट्रपतीपदाचा उमेदवार जाहीर केला आहे. तर राष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षांचे संयुक्त उमेदवार हे यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) असणार आहेत. सिन्हा हे माजी केंद्रीय मंत्री आहेत. विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारासाठी सिन्हांच्या नावाचा विचार सुरू होता. आता त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

कोण आहेत द्रोपत्ती मुर्मो ?

द्रोपत्ती मुर्मो या १९९७ साली ओडिशाच्या रायरंगपूर जिल्हा परिषद सदस्या म्हणून निवडून आल्या. त्याच वर्षी मुर्मू या रायरंगपूरचे उपाध्यक्ष झाले.२००० च्या विधानसभा निवडणुकीत द्रोपत्ती मुर्मो निवडून मतदारसंघातून निवडून आल्या. त्यानंतर २०२२ साली त्यांना परिवहन आणि वाणिज्य खाते देण्यात आले. २००२ साली ओडिशा सरकारने त्यांना फिश अँड लाइव्हस्टॉकचा पोर्टफोलिओ प्रदान करण्यात आला. २००४ पर्यंत मुर्मो त्या पदावर होत्या. त्यानंतर २००२ ते २००९ पर्यंत मुर्मो यांनी मयूरभंज जिल्ह्यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम केले. २००४ साली त्या रायरंगपूरच्या आमदार म्हणून निवडून आल्या आणि 2009 पर्यंत त्यांनी काम केले.

पुढे द्रोपत्ती मुर्मो यांनी २००६ ते २००९ भाजपच्या विविध पदावर काम करून पक्षाला योगदान दिले. त्यानंतर २०१० साली मयूरभंज जिल्ह्यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणून पुन्हा नियुक्त करण्यात आले. पुढे २०१३ साली मयूरभंज जिल्ह्यासाठी तिसऱ्यांदा भाजपच्या जिल्हाध्यक्ष बनल्या. २०१५ वर्षाच्या एप्रिलपर्यंत त्या जिल्हाध्यक्ष पदावर होत्या. त्यानंतर २०१५ सालच्या मे महिन्यात झारखंडचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

KPK Jeyakumar : काँग्रेस नेत्याचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ; दोन दिवसांपासून होते बेपत्ता

Riteish Deshmukh: मराठमोळ्या रितेश देशमुखची 'लय भारी...' फॅशन

Ruby Roman Grapes : ही द्राक्षे तयार करण्यासाठी लागली १४ वर्षे, एका घडाची किंमत आहे १० लाख

Raj Thackarey: उद्धव ठाकरे गेल्या १०वर्षात साडेसात वर्षे सत्तेत, मग उद्योग गुजरातला कसे गेले? राज ठाकरेंचा सवाल

Home Decor Idea : कमी खर्चात बर्ड थे पार्टीसाठी घर कसं सजवाल? जाणून घ्या सोप्या ट्रिक्स

SCROLL FOR NEXT