कणकवली: मार्मिक आणि आक्रमक भाषणासाठी ओळखले जाणारे राज ठाकरे यांनी महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ कणकवलीत सभा घेतली. कणकवलीच्या सभेत राज ठाकरेंनी बारसू,नाणार प्रकल्पावर उद्धव ठाकरेंवर टीका केली. कोकणातील उद्योग धंदे गुजरातमध्ये जात असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी काल केली होती. त्यावर बोलताना राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या टीकेचा खरपूस समचार घेतला.
२०१४ ते २०१९ पर्यंत भाजपसोबत शिवसेना सत्तेत बसली होती. त्यानंतर तुम्ही दोन वर्ष मुख्यमंत्री होतात, म्हणजे महाराष्ट्रातील सत्तेत १० वर्षातून तु्म्ही साडेसात वर्ष उद्धव ठाकरे सत्तेत होते. यावर्षात उद्योग धंदे राज्याबाहेर गेले कसे, असा खणखणीत सवाल राज ठाकरे यांनी कणकवलीच्या सभेत केला.
तुम्ही सत्तेत असताना सुद्धा उद्योग धंदे बाहेर राज्यात जात होते तेव्हा तुम्ही का प्रश्न केला नाहीत?उद्योग धंदे राज्यात आले की, खासदार विरोध करतो आणि आमदार पाठिंबा देतो. आपण का विरोध करतो हे खासदाराला माहिती सुद्धा नसतं. जैतापूरचा आणूऊर्जा प्रकल्प या प्रकल्पाने कोकणाचा नाश होईल. तेथे जर स्फोट झाला तर काही होईल,तर किती माणसं मरतील अशी चिंता व्यक्त केली जाते परंतु या चिंता वाहणाऱ्यांना माहिती नाही का मुंबईत भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर हे मुंबईत आहे.
न्यूक्यलर रिअॅक्टर सेंटर सुद्धा मुंबईत आहे. त्याचाही स्फोट झाला तर हानी मोठी होते. परंतु हे प्रोजेक्ट मुंबईतून बाहेर न्यावीत असं कधी हे म्हणाले नाहीत, असे राज ठाकरे म्हणालेत. पण कोकणात प्रकल्प येणार असेल तर ते विरोध केला जातो. नाणार प्रकल्पसाठीही विरोध असाच केला गेला. या प्रकल्पात बागायती शेत जमिनी यात जाणार असल्याची भीती मनात घेतली जाते.नाणार प्रकल्प दुसरीकडे हलवण्यात आला. तेथे या प्रकल्पाचं नवा बारसू असं करत तेथे ५ हजार एकर जमिनी मिळाली असून तेथे हा प्रकल्प स्थापला जाईल असं सांगितलं जातं परंतु या इतकं जमिनी मिळाली कशी, असा सवाल राज ठाकरे यांनी यावेळी केला.
प्रकल्प आणणे आणि त्याला विरोध करणं यामागे जमिनीच्या व्यवहाराचे धागे जोडलेले असल्याचं राज ठाकरे म्हणालेत. प्रकल्प आला की विरोध करायचा आणि जमिनीचा दर वाढवावयचा, शेतकऱ्यांकडून किंमतीत जमिनी घ्यायच्या नंतर सरकारला अधिक पैशात जमिनी देऊन प्रकल्प सुरू करायचा असा धंदा कोकणातील खासदार आमदार करत असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी कणकवलीतील सभेत केला. कोकणात चांगले प्रकल्प यावेत, प्रदूषण मुक्त प्रकल्प यावेत अशी इच्छा सर्वांची आहे. गोव्यात पाहिलं तर किती प्रगती झालीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.