BJP LEADER’S SON DIES IN ROAD ACCIDENT AFTER FLAG HOISTING saam tv
देश विदेश

ध्वजारोहण करून परतत होता, वाटेतच काळाने गाठलं; भाजप नेत्याच्या मुलाचा अपघातात मृत्यू

Tragedy Strikes After Independence Day: उत्तर प्रदेशातील मिर्झापूरमध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम आटोपून घरी परतणाऱ्या भाजप नेत्या विद्या सिंह यांच्या २२ वर्षीय मुलाचा अपघातात मृत्यू झाला. भरधाव ऑटोने दुचाकीला धडक दिल्यानंतर दीपक सिंह यांचा मृत्यू झाला.

Omkar Sonawane

उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यातील जिगना पोलीस ठाणे हद्दीतील नेगुरा रिबई सिंह गावातील भाजप नेत्या विद्या सिंह यांच्या २२ वर्षीय मुलाचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. दीपक सिंह असे मृत तरुणाचे नाव आहे. ध्वजारोहणाचा कार्यक्रम आटोपून दुचाकीवरून घरी परतत असताना प्रयागराजमधील मांडा पोलीस ठाणे हद्दीत हा अपघात झाला. विद्या सिंह या भाजपच्या छानबे मंडळाच्या उपाध्यक्ष आहेत. त्यांचा मुलगा दीपक गेल्या दोन महिन्यांपासून मध्य प्रदेशातील चाकघाट येथे एका मायक्रो फायनान्स कंपनीत नोकरी करत होता.

कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वातंत्र्यदिन साजरा केल्यानंतर दीपक शनिवारी सकाळी दुचाकीवरून घरी परतत होता. सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास गौरीशंकरजवळ समोरून येणाऱ्या भरधाव ऑटोने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दीपक गंभीर जखमी झाला. स्थानिक नागरिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. कुटुंबीयही घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर दीपकला उपचारासाठी प्रयागराजला घेऊन जात असताना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला.

दीपक हा दोन भाऊ आणि दोन बहिणींमध्ये सर्वात लहान होता. तो अविवाहित होता. त्याचा मोठा भाऊ विकास सिंह सोनभद्र येथे नोकरी करतो. दीपकच्या मृत्यूची बातमी समजताच कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. प्रयागराज येथे शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शनिवारी संध्याकाळी दीपकचा मृतदेह गावात आणण्यात आला. मृतदेह घरी पोहोचताच कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. संपूर्ण गावावर शोककळा पसरली.

दीपकच्या निधनाची माहिती मिळताच भाजपचे जिल्हा महामंत्री स्वामीनाथ सिंह यांच्यासह वीरेंद्र कुमार तिवारी, इंद्र कुमार सिंह, राजेंद्र पाठक, सुजीत मोदनवाल यांच्यासह अनेक भाजप नेते आणि ग्रामस्थांनी त्यांच्या घरी जाऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. अचानक झालेल्या या मृत्यूमुळे कुटुंबीयांसह संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care: स्ट्रेट, कर्ली की वेव्ही? तुमच्या केसांच्या प्रकारानुसार निवडा 'हा' परफेक्ट कंगवा

मोठी बातमी! राज्यात १,४४० डॉक्टरांची नियुक्ती लवकरच होणार; आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Kasara Tourism : धुक्याची चादर, फेसाळलेला धबधबा अन् हिरवागार निसर्ग; कसाराजवळची 'ही' ठिकाणं पावसाळी पिकनिकसाठी खास

Director Death: प्रसिद्ध दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; तीन राष्ट्रीय पुरस्कारांनी झाले होते सन्मानित, मनोरंजन विश्वावर शोककळा

Mental Health Tips : सतत उदास आणि निराश वाटतंय? या आजाराची आहेत ही गंभीर लक्षणे

SCROLL FOR NEXT