Political News : देशात एकीकडे विरोधकांची एकजूट सुरु आहे. नितीश कुमार यांनी विरोधकांची पहिली बैठकी पाटण्यात आयोजित केली होती. मात्र हेच नितीश कुमार एनडीएमध्ये सहभागी होतील असा मोठा दावा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केला होता. मात्र भाजप खासदार सुशील मोदी यांनी हा दावा फेटाळत नितीश कुमार यांना यायचे असले तरी भाजप त्यासाठी तयार नाही असं म्हटलं.
रामदास आठवले हे भाजपचे प्रवक्ते किंवा एनडीएचे प्रवक्ते नाहीत. ते त्यांच्या पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री आहेत. त्यामुळे ते त्यांचे वैयक्तिक मत असेल. सुशील मोदी पुढे म्हणाले की, भाजपने आपले सर्व दरवाजे बंद केले आहेत. ते आता ओझं बनले आहेत. राजद देखील त्यांना फार जास्त काळ सहन करू शकेल की नाही याबद्दल मला शंका आहे. (Latest Marathi News)
नितीश कुमार यांची मते मिळवण्याची क्षमता संपली आहे. नरेंद्र मोदी आले नसते तर त्यांनी ४४ जागाही जिंकल्या नसत्या, असे गेल्या विधानसभा निवडणुकीत दिसून आले . राजकारणात मतांची ताकद असेल तर तुम्ही महत्त्वाचे आहात, अन्यथा तुमचे महत्त्व नाही, असंही सुशील मोदी यांनी म्हटलं. (Political News)
काय म्हणाले होते रामदास आठवले?
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार कधीही एनडीएमध्ये परत येऊ शकतात, असं रामदास आठवले यांनी शनिवारी म्हटले होते. महाराष्ट्रात होणार्या विरोधी पक्षनेत्यांच्या तिसर्या बैठकीला नितीश कुमार यांनी उपस्थित राहू नये, असं आवाहनही त्यांनी केले होते. एनडीएमध्ये नितीश यांची कमतरता नेहमीच जाणवत असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.