BJP leader Surendra Kevat fatally shot in Patna. Attackers fled the scene. Police investigation and political outrage underway. 
देश विदेश

भाजप नेत्याची मध्यरा‍त्री गोळ्या झाडून हत्या, दुचाकीवर आलेल्या दोघांनी अंधारात डाव साधला

BJP leader shot dead : पटनामधील भाजप नेते सुरेंद्र केवट यांची अज्ञात दुचाकीस्वारांनी गोळ्या झाडून हत्या केली. सीसीटीव्हीच्या मदतीने हल्लेखोरांचा शोध सुरू असून, प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

Namdeo Kumbhar

BJP Leader Surendra Kevat Shot Dead In Patna : नितीशकुमार यांच्या बिहारमध्ये हत्येच्या घटना थांबायचं नाव घेत नाहीत. व्यावसायिक, भाजप नेता गोपाल खेमका यांच्या हत्या होऊन आठवडाही झाला नाही, तोच पुन्हा एकदा बिहारमध्ये आणखी एका भाजप नेत्याची हत्या झाली. शनिवारी रात्री अंधाराचा फायदा घेत दुचाकीवर आलेल्या दोघांनी पटनामधील स्थानिक भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेचे पडसाद बिहारमध्ये उमटले आहेत. तेजस्वी यादव यांनी नीतीश कुमार यांच्यावर निशाणा साधलाय. चूक कुणाची आहे? कुणाला जाब विचारायचा? असा सवाल यादव यांनी उपस्थित केलाय. हत्या झालेल्या भाजप नेत्याचे नाव सुरेंद्र केवट असं आहे. शनिवारी रात्री ते शातामधील पाण्याची मोटर बंद करण्यासाठी गेले होते, त्यावेळी अंधारात दोन जणांनी डाव साधत गोळ्या झाडून हत्या केली.

पटनामधील पीपरा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये भाजप नेते सुरेंद्र केवट यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली. दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात गुंडांनी त्यांच्यावर चार राऊंड फायर गेल्या. जखमी अवस्थेत त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले, पण उपचारावेळी त्यांचा मृत्यू झाला. सुरेंद्र केवट (५२) हे भाजप किसान मोर्चाचे पुनपुनचे माजी अध्यक्ष होते. या घटनेची माहिती मिळताच फुलवारीशरीफ विधानसभा क्षेत्राचे आमदार गोपाल रविदास आणि माजी मंत्री श्याम रजक रुग्णालयात पोहोचले. परिसरात संतापाचे वातावरण आहे.

सुरेंद्र केवट कोण होते? Who was Surendra Kevat, BJP leader shot in Bihar?

सुरेंद्र केवट हे आपल्या कुटुंबासह शेखपुरा गावात राहत होते. ते पुनपुन प्रखंडातील भाजप नेते असण्यासोबतच ग्रामीण पशुवैद्यकही होते. सुरेंद्र शेती-कामकाज करत होते, ते अत्यंत साधं जीवन जगत होते. राजकारणात त्यांची चांगली पकड होती. शनिवारी मध्यरात्री जेवण करून ते दुचाकीने आपल्या गावाकडे जात होते. गावाबाहेरील बिहटा-सरमेरा राज्य महामार्ग-78 वर त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. ते शेतात मोटर बंद करण्यासाठी गेले होते आणि दुचाकीवर बसताच त्यांच्यावर हल्ला झाला. केवट यांच्यावर हल्ला का झाला? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

हल्लेखोरांचा शोध सुरू केला

केवट यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी अज्ञात गुंडांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही कॅमेरे तपासत आहेत. फुटेजच्या मदतीने आरोपींची ओळख पटवली जाईल. या घटनेमुळे राज्याच्या सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saina Nehwal: सायना नेहवाल - पारूपल्ली कश्यप विभक्त, ७ वर्षांचा सुखी संसार मोडला; सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

Plane Crash: उड्डाण घेताच काही सेकंदात विमान कोसळलं, उडाला मोठा भडका; परिसरात काळेकुट्ट धुरांचे लोट; अपघाताचा थराराक VIDEO

Wardha News : अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेसमध्ये सीटवर बसण्यावरून वाद; तरुणाकडून प्रवाशावर ब्लेडने सपासप वार

Viral Video: मी आता आझाद झालोय! घटस्फोटाच्या आनंदात पठ्ठ्याची दुधाने अंघोळ, व्हिडिओ व्हायरल

Stunt Artist Raju Death : सिनेमाच्या सेटवर मोठी दुर्घटना; प्रसिद्ध कलाकाराचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT