Delhi CM Rekha Gupta Shapath Grahan 
देश विदेश

Delhi CM Rekha Gupta Oath : रेखा गुप्तांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ, मंत्रिमंडळात कोण कोण?

Delhi CM Rekha Gupta Oath : रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत रामलीला मैदानावर शपथविधी सोहळा पार पडला.

Namdeo Kumbhar

Delhi CM Rekha Gupta Shapath Grahan : पहिल्यांदाच आमदार झालेल्या रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. रामलीला मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत शपथविधी सोहळा पार पडला. रेखा गुप्ता यांच्याशिवाय आणखी सहा नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. भाजपचे अनुभवी नेते प्रवेश वर्मा यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. रामलीला मैदानावर झालेल्या शपथविधी सोहळ्याला भाजपच्या अनेक दिग्गजांची उपस्थिती होती. भाजप शासित मुख्यमंत्र्यांनी या सोहळ्याला उपस्थिती दर्शवली होती.

२७ वर्षांच्या कालावधीनंतर भाजपला दिल्लीमध्ये पुन्हा सत्ता मिळाली आहे. पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आलेल्या रेखा शर्मा यांची मुख्यमंत्रिपदी वर्णी लागली. रेखा गुप्ता या दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री ठरल्या आहेत. याआधी सुषमा स्वराज, शिला दिक्षित आणि आतिशी यांनी दिल्लीचे मुख्यमंत्रिपद सांभाळले आहे. रेखा गुप्ता यांच्यासोबत सहा जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. भाजपचे दिल्लीतील अनुभवी नेते प्रवेश वर्मा यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

दिल्ली मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यासोबत आणखी ६ नेत्यांनी शपथ घेतली आहे.

१. भाजप आमदार प्रवेश वर्मा. हे दिल्लीचे माजी मुख्यमंत्री साहिब सिंह वर्मा यांचे पुत्र आहेत.

२. भाजप आमदार आशिष सूद. हे दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष देखील आहेत.

३. भाजप आमदार मनजिंदर सिंह सिरसा. हे शीख गुरूद्वारा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष देखील आहेत.

४. भाजप आमदार रवींद्र सिंह. हे भाजप एससी मोर्चाचे राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य आहेत.

५. भाजप आमदार कपिल मिश्रा. ते दिल्ली महानगरपालिकेच्या माजी महापौर अन्नपूर्णा मिश्रा यांचा चिरंजीव आहेत.

६.भाजप आमदार पंकज कुमार सिंह. हे मुळचे बिहारचे आहेत. पूर्वांचल राजपूत हे विकासपुरीमधून पहिल्यांदाच आमदार झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Aus: विजयी चौकार मारून जेमिमाला अश्रू अनावर; भर मैदानात कर्णधार हरमनप्रीतलाही कोसळलं रडू, पाहा Video

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांना कधी मिळणार कर्जमाफी? मुख्यमंत्र्यांनी सांगितली तारीख

Ind vs Aus Semifinal: शाब्बास पोरींनो! भारताच्या लेकींनी मैदान गाजवलं, ऑस्ट्रेलियाला नमवत फायनलमध्ये दणक्यात एन्ट्री

WC Semifinal: मानधनाच्या विकेटवर भरमैदानात राडा; थर्ड अंपायरच्या निर्णयानं फलंदाजासह ग्राउंड रेफरीही बुचकळ्यात

Maharashtra Opposition Unity : मतदारयाद्यांचा घोळ, निवडणुकीला विरोध? 'सत्याचा मोर्चा'साठी विरोधक एकवटले, VIDEO

SCROLL FOR NEXT