New Delhi CM : दिल्लीची धुरा रेखा गुप्तांकडे, ६ मंत्री घेणार शपथ, भाजपच्या मंत्रिमंडळाची यादी समोर

Delhi CM oath ceremony : भाजपने राजधानी दिल्लीची धुरा रेखा गुप्ता यांच्याकडे सोपवली आहे. आज रामलीला मैदानावर त्यांचा शपथविधी पार पडणार आहे. दिल्लीच्या मंत्रिमंडळात जाट, शिख, पंजाबी अन् दलित नेत्यांचा समावेश करत भाजपने संतुलन ठेवलेय.
Rekha Gupta to Take Oath as Delhi CM
Rekha Gupta to Take Oath as Delhi CM
Published On

Rekha Gupta to Take Oath as Delhi CM : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने राजधानी दिल्ली काबिज केली आहे. भाजपकडून मुख्यमंत्री म्हणून रेखा गुप्ता यांची निवड करण्यात आली आहे. रेखा गुप्ता आज रामलीला मैदानावर मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. रेखा गुप्ता यांच्या मंत्रिमंडळात सहा मंत्री पहिल्या टप्प्यात शपथ घेणार आहेत. त्याची यादी समोर आली आहे. कपिल मिश्रा आणि प्रवेश वर्मा यांच्यासह दिग्गजांचा यामध्ये समावेश आहे. दिल्लीच्या मंत्रिमंडळात जाट, शिख, पंजाबी अन् दलित नेत्यांचा समावेश करत भाजपने संतुलन राखलेय.

रेखा गुप्ता यांच्या मंत्रिमंडळात कोण कोण?

राजधानी दिल्लीच्या मुख्यमंत्रि‍पदाच्या निवडीनंतर भाजपचे मंत्रिमंडळाची यादी समोर आले आहे. नव्या मंत्रिमंडळात प्रवेश वर्मा (जाट), मनजिंदर सिरसा (शिख), आशीष सूद (पंजाबी) आणि रविंदर इंद्रज सिंह (दलित) या नेत्यांचा समावेश आहे. पूर्वांचलचे प्रतिनिधित्व करणारे पंकज सिंह आणि कपिल मिश्रा यांचाही समावेश आहे. रेखा गुप्ता यांच्यासोबत सहा मंत्री गुरुवारी रामलीला मैदानावर शपथ घेणार आहेत.

Rekha Gupta to Take Oath as Delhi CM
Ladki Bahin Yojana: आणखी २ लाख लाडक्या बहिणींचे अर्ज बाद, फेब्रवारीचा हप्ता कधी येणार?

दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री -

बुधवारी रेखा गुप्ता यांची विधिमंडळाच्या नेत्या म्हणून निवड झाली. प्रवेश वर्मा आणि विजेंद्र गुप्ता यांनी मुख्यमंत्रि‍पदासाठी रेखा गुप्ता यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला होता, त्याला सर्वांनी पंसती दर्शली. रेखा गुप्ता राजधानी दिल्लीच्या चौथ्या महिला मख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. याआधी सुषमा स्वराज, शीला दीक्षित आणि आतिशी यांनी राजधानीचे मुख्यमंत्रिपद भूषवले आहे. भाजपशासित राज्यातील रेखा गुप्ता या एकमेव महिला मुख्यमंत्री असतील. रेखा गुप्ता पहिल्यांदाच आमदार झाल्या होत्या, त्यांच्यावर भाजपने मोठा विश्वास दाखवला आहे. त्या दिल्लीच्या तीन वेळा नगरसेवक राहिल्या आहेत.

Rekha Gupta to Take Oath as Delhi CM
IND vs PAK : आता भारताला दुबईत हरवा, शाहीद आफ्रिदी पुन्हा बरळला

शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी -

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. रामलीला मैदानावर भव्य असे आयोजन कऱण्यात आलेय. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्री मंत्री राजनाथ सिंह, अमित शाह, जेपी नड्डा यांचा समावेश असेल. त्याशिवाय देशभरातलील भाजपचे २० मुख्यमंत्री आणि महत्त्वाचे नेते या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहे. भाजपचे मित्रपक्ष असणाऱ्या नेत्यांनाही आमंत्रित करण्यात आलेय.

माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आतिशी यांनाही या सोहळ्याचे आमंत्रण देण्यात आले आहे. दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष देवेंद्र यादव यांनाही आमंत्रित करण्यात आलेय. त्याशिवाय शेतकरी, कॅब चालाकांनाही सोहळ्याच आमंत्रण देण्यात आलेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com