BJP News  Saam tv
देश विदेश

Political News : ऐन निवडणुकीच्या काळात बड्या नेत्यानं सोडली भाजपची साथ; तृणमूल काँग्रेसमध्ये केला प्रवेश

Bengal Political News : नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पणतू चंद्र कुमार बोस यांनी भाजपचा राजीनामा देत तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या मोठ्या बदलामुळे बंगालच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

Alisha Khedekar

  • चंद्र कुमार बोस यांनी भाजपचा राजीनामा दिला

  • तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश

  • बंगाल निवडणुकीआधी राजकीय खळबळ

  • भाजपला मोठा धक्का, टीएमसीला फायदा

Bengal Chandra Kumar Bose Join Congress News बंगालच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आले आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पणतू चंद्र कुमार बोस यांनी रविवारी भाजप पक्षाचा राजीनामा देऊन सत्ताधारी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. विधानसभा निवडणुका अगदी तोंडावर झालेल्या या मोठ्या उलथापालथीमुळे पश्चिम बंगालच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. चंद्र कुमार बोस यांचा टीएमसीमधील प्रवेश हा ममता बॅनर्जी यांच्या पक्षासाठी एक मोठा राजकीय फायदा मानला जात आहे, तर भाजपला हा एक मोठा धक्का ठरला आहे.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पणतू चंद्र कुमार बोस यांनी भाजप पक्षावर टीका करत आज पक्षाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी ममता बॅनर्जी यांच्या सत्ताधारी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे बंगालच्या राजकारणात खळबळ उडाली असून नव्या चर्चांना उधाण आले आहे.

पक्ष सोडल्यानंतर चंद्र कुमार बोस म्हणाले की, आता ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसमध्ये सामील होऊन बंगालच्या जनतेची सेवा करणार आहेत. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याला मोठी चूक असल्याचे म्हटले आहे. पुढे म्हणाले की, त्यांना ही चूक उशिरा का होईना लक्षात आली. निवडणुका जिंकण्यासाठी मतदारांमध्ये फूट निर्माण करणे हाच जर एखाद्या पक्षाचा एकमेव उद्देश असेल, तर ते मला मान्य नाही असे त्यांनी यावेळेस म्हटले.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुका दोन टप्प्यांत होणार आहेत. पहिल्या टप्प्यात १५२ जागांसाठी २३ एप्रिल रोजी, तर दुसऱ्या टप्प्यात १४२ जागांसाठी २९ एप्रिल रोजी मतदान होईल. ४ मे रोजी मतदान पूर्ण होऊन निकाल जाहीर केला जाईल. २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने २१३ जागा जिंकून दणदणीत विजय मिळवला होता, तर भाजपने ७७ जागा जिंकल्या होत्या. यावेळीही दोन्ही प्रमुख पक्षांमध्ये अटीतटीची लढत अपेक्षित आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Egg For Diabetes: डायबिटीज असणाऱ्यांनी अंडी खावी की नाही? जाणून घ्या

Maharashtra News Live Update: दुष्काळ घोषणेवर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया; चंद्रपूरमधील सुटलेल्या तालुक्यांसाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी

खासदार-आमदारांची पळवापळवी! २०२२ पासून १११ नेत्यांनी बदलला पक्ष, भाजप दुसऱ्या क्रमांकावर; आकडेवारी पाहून चक्रावून जाल

Good News: पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! ऑक्टोबरमध्ये मिळणार ५ महिन्यांच्या पेन्शनची थकबाकी; एकाचवेळी किती पैसे मिळणार?

Dal Makhani Recipe: हॉटेलमध्ये खाण्याची गरज नाही! अशी बनवा घरच्या घरी रेस्टॉरंटसारखी दाल माखनी

SCROLL FOR NEXT