वृत्तसंस्था : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ या ठिकाणी ह्द्रय पिळवटून टाकणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. याठिकाणी एका व्यक्तीने पत्नीपासून त्रस्त होऊन स्वत:वर गोळी झाडून घेतली आहे. यानंतर दुर्घटनास्थळीच व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलीस घटनास्थळी पोहचली आहेत. तेव्हा व्यक्तीचा मृतदेह एका खुर्चीवर पडलेल्या अवस्थेत आढळून आला आहे.
पोलिसांनी पाहणी केली असता मृतदेहाशेजारी एक सुसाईड नोट देखील सापडली आहे. त्यामध्ये व्यक्तीने आत्महत्येकरिता त्याच्या पत्नीला जबाबदार धरले आहे. त्याचबरोबरच पोलिसांना परवानाधारक पिस्तुल देखील सापडली आहे. ज्यातून मृत व्यक्तीने स्वत:वर गोळी झाडली होती. सध्या पोलिसांनी मृतदेह पोस्टमोर्टमला पाठवण्यात आला आहे.
हे देखील पहा-
पुढील तपास सुरू आहे. मृत व्यक्तीचे नाव अभिषेक शुक्ला असे आहे. तो मूळचा गोरखपूरच्या सिंघडिया कॉलनीतील रहिवासी आहे. नोकरीकरिता तो लखनऊला आला होता. लखनऊच्या सुशांत गोल्फ सिटी परिसरात नंदिनी अपार्टमेंटमध्ये तो राहत होता. अभिषेक शुक्ला हा स्थानिक भाजपा नेता होता. एसीपी साउथ स्वाती चौधरी सांगितले की, मृत अभिषेकने आत्महत्ये अगोदर एक सुसाईड नोट लिहिली होती.
या नोटमध्ये आत्महत्येसाठी पत्नी कुमुदला जबाबदार धरले होते. कुमुद ओमेक्स सिटीत राहते. दोघांमध्ये मागील काही दिवसापासून वाद सुरू होता. त्यामुळेच अभिषेक वैतागला होता. अभिषेक शुक्ला तो चिंतेत जगत होता. घटनास्थळावरुन पोलिसांनी सुसाईड नोटसह मोबाईल फोन आणि घटनास्थळी आढलेल्या काही वस्तू जप्त करण्यात आले आहेत. अभिषेक शुक्लाने घेतलेल्या या टोकाच्या निर्णयामुळे सगळेच हैराण आहेत.
पोलिसांनी या संबंधात अभिषेकची पत्नी कुमुद हिला चौकशीकरिता ताब्यात घेणार आहे. घटनेशी निगडीत सर्व पैलूवर तपास केला जात आहे. जे काही तथ्य बाहेर येईल, त्या आधारावर कारवाई केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. अभिषेक शुक्ला आणि त्याची पत्नी कुमुद यांच्यात नेमका कोणता वाद होता? कुमुदने पती अभिषेकला आत्महत्येकरिता प्रवृत्त केले का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे सध्या अनुत्तरीत आहेत. मात्र, अभिषेक शुक्लाच्या आत्महत्येने परिसरात मोठ्या प्रमाणात खळबळ माजली आहे.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.