BJP leader Arjun Maida, who reportedly died by suicide near his residence in Banswara, Rajasthan. saam tv
देश विदेश

भाजपच्या दिग्गज नेत्याची गळफास घेऊन आत्महत्या; राजकीय वर्तुळात खळबळ

BJP Leader Arjun Maida End Life Reason In Rajasthan: भाजपचे जिल्हा मंत्री अर्जुन मईडा यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून पोलिस तपास सुरू आहे.

Saam Tv

भाजपच्या नेत्यांसाठी अत्यंत धक्का देणारी एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. राजस्थानच्या बासवाडा येथील भाजपच्या एका नेत्याने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली आहे. भाजप नेत्याने आपल्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळाली होती. मात्र पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी घराबाहेरील झाडाला गळफास लावला.

अर्जुन मईडा (वय52) हे बासवाडा भाजपमध्ये जिल्हा मंत्री म्हणून कार्यरत होते. मईडा हे गेल्या काही दिवसांपासून घरगुती वाद आणि त्रासामुळे त्रस्त होते, त्यांच्या या अचानक घेतलेल्या टोकाच्या पावलामुळे त्यांचे कुटुंबीय, समर्थक आणि भाजप कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे. या घटनेची माहिती मिळताच परिसरात शोककळा पसरली असून मईडा यांच्या निवासस्थानी लोकांची मोठी गर्दी जमा झाली.

बसवाडा भाजपमध्ये होती मजबूत पकड

बासवाडा भाजपच्या पदाढीकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्जुन मईडा यांनी भाजपचे सक्रिय सदस्य म्हणून तळागळात संघटना मजबूत करण्यात अत्यंत महत्वाची भूमिका बजावली होती. ते छोटी सरवनचे माजी मंडळ अध्यक्षही राहिले होते. तसेच ते पंचायत समितीवर देखील सदस्य म्हणून निवडून आले होते. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघांशीही जोडलेले होते.

या प्रकरणाबाबत पोलिसांनी सांगितले की, अर्जुन मईडा यांनी शनिवारी रात्री घराच्या जवळ असलेल्या एका आंब्याच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. त्यांनी आत्महत्या का केली याचे कारण शोधले जात आहे, मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे असे पोलिसांनी सांगितले. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून पक्षात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : अंबरनाथचे 'ते' १२ नगरसेवक भाजपा प्रदेशाध्यक्षांच्या भेटीला!

High blood pressure: तरुणांमध्ये झपाट्याने वाढतोय उच्च रक्तदाब, डॉक्टरांनी दिला धोकादायक ‘सायलेंट किलर’चा इशारा

Maharashtra Politics: मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना बालेकिल्ल्यातच एकनाथ शिंदेंकडून मोठा झटका, बड्या नेत्याने ५०० कार्यकर्त्यांसह सोडली साथ

Mango Rice Recipe : उन्हाळ्यात रात्रीच्या जेवणाला बनवा आंबट-गोड 'मँगो राईस', खमंग वासानेच भूक दुप्पट लागेल

Kidney Stone Food: किडनी स्टोनची झंझट मिटवायचीय? तर आजपासून 'हे' 6 पदार्थ खाणं सुरू करा...

SCROLL FOR NEXT