भर समुद्रात मासळीची लूट, ट्रॉलरला घेराव घालून मासळीवर दरोडा

Konkan Fishermen Face New Crisis: कोकणात पर्ससीन नेटने मासळी पकडणाऱ्या मच्छिमारांसमोर आता नवीन संकट उभं ठाकलंय. भर समुद्रात मासळीची लूट सुरु आहे. कोण करतंय ही लूट? ट्रॉलर मालक कोणाच्या दहशतीत आहेत ? पाहूया एक रिपोर्ट...
Fish looting incidents reported off the Konkan coast
Fish looting incidents reported off the Konkan coastsaam tv
Published On: 

हा व्हिडीओ नीट बघा... तुम्हाला वाटलं असेल बोटीतून मासे उतरविण्यासाठी मच्छीमार एकत्र आलेत... थांबा... तसं अजिबात नाहीये... यांना सुमद्री चाचे म्हटलं तरी वावगं ठरणार नाही...होय... कारण हा आहे किंमती ऐवजांवर नव्हे तर चक्क माशांवर टाकलेला दरोडा... त्याचं झालं असं की, कोकणातील मच्छिमारांचे अनेक प्रश्न प्रलंबित असताना आता मासळी चोरीच्या वाढत्या घटनांनी ट्रॉलर मालक दहशतीत आहेत. विशेषत: देवगड ते वेंगुर्ला या सागरी हद्दीत मासेमारी करणाऱ्या ट्रॉलर नौकांमधील मासळीची छोट्या नौकाधारकांकडून संघटितपणे लूट केली जात असल्याची तक्रार आहे. इतकंच नव्हे तर ट्रॉलरला आग आणि जाळी तोडून टाकण्याची भिती दाखवली जाते. ही लूट गेली 2-3 वर्षापासून होत असून आता हे प्रमाण वाढल्याचं ट्रॉलर मालक सांगतात. याप्रकरणी देवगड पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आलीये.

समुद्रातील लुटीचा व्हिडिओ समोर आल्यानंतर मोठ्या नौकेतील तांडेल, खलाशांमध्ये भिती निर्माण झाली आहे. चोरीच्या वेळी ओळखू पटू नये यासाठी होड्यांना रंग लावला जातो. नाव, नंबर पुसून टाकला जातो. कोकणात पर्ससीन आणि पारंपरिक मच्छिमारांमधील संघर्ष काही नवीन नाही. मात्र आता मच्छीचोरांच्या उच्छादानं मच्छीमारांसमोर नवं संकट ओढावलंय. मच्छीमारांना समुद्रात लुटणाऱ्या या मच्छीचोर समुद्री चाच्यांना आता गजाआड करण्याची वेळ आलीये. त्यासाठी आता सरकार कशी ठोस कारवाई करतं या कडे लक्ष लागून राहिलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com