अण्णामलाई भाजप सोडून नवा पक्ष स्थापन करू शकतात, अशी जोरदार चर्चा सुरू.
समर्थकांकडून सोशल मीडियावर कथित पक्षचिन्ह आणि झेंड्यांचे पोस्ट व्हायरल.
अण्णामलाई यांनी अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर
तमिळनाडूमधील राजकारणात आणखी एक मोठी मोठी घडामोड होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. AIADMKमधील काही आमदारांनी बंड पुकारत टीव्हीकेला समर्थन दिलं होतं. आता भाजपला मोठा धक्का बसणार आहे. तमिळनाडू भाजपमध्ये मोठी उलथापालथ होणार आहे. भाजपचे माजी अध्यक्ष अण्णामलाई पक्षाची साथ सोडण्याची शक्यता आहे. भाजपमधून बाहेर पडून ते थेट दुसरा पक्षाची स्थापना करणार असल्याची शक्यता आहे.
या राजकीय घडामोडीवर अण्णामलाई यांनी पक्षातून बाहेर पडण्याच्या चर्चांवर कोणतीच प्रतिक्रिया दिली नाहीये. परंतु अण्णामलाई भाजपमधून बाहेर पडणार असल्याची चर्चा तेव्हा सुरू झाली, जेव्हा त्यांना भाजपमध्ये मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. एका वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, अण्णामलाई भाजपशी काडीमोड करून नवी पक्षाची स्थापना करणार असल्याच्या विचारात असल्याची संकेत त्यांच्या समर्थकांकडून मिळत आहेत.
अण्णामलाई यांचे समर्थक सोशल मीडियावर पक्षाचे चिन्ह आणि पक्षाबाबतचे पोस्ट व्हायरल करत आहेत. पक्षाच्या झेंड्याचे ध्व्ज तयार करून ते व्हायरल केली जात आहेत. परंतु अण्णामलाई यांनी याबाबत कोणतीच प्रतिक्रिया दिली आहे.
अण्णामलाई यांनी केंद्र सरकारच्या तीन भाषांच्या मुद्द्यांवरून वेगळी भूमिका मांडली होती. अण्णामलाई यांनी नववी इयत्तेसाठी केंद्राने अनिवार्य केलेल्या तीन भाषांचा नियम मागे घेण्याची विनंती केली होती. CBSEच्या नववी इयत्तेतील विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकणं अनिवार्य केले आहे, त्यावर अण्णामलाई यांनी विरोध दर्शवला होता. अण्णामलाई यांनी केंद्राला विनंती केली होती की, वर्ष २०२९-३० च्या शैक्षणिक वर्षापासून तीन भाषांमधील कोणत्यातरी दोन भाषांची निवड करावी हाच निर्णय कायम असावा.
दरम्यान CBSEम्हणजे केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाने १५ मे २०२६ला सर्व सीबीएसई संचलित विद्यालयांमध्ये निवेदन पाठवली होती. या निवेदनानुसार चालू शैक्षणिक वर्षात इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांना तिसरी भाषा अनिवार्य करण्यात यावी अशा सुचना देण्यात आल्या होत्या. अण्णामलाई यांनी सांगितलं की, एप्रिल २०२६ मध्ये जेव्हा सीबीएसईने घोषणा केली होती की, इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी तीन भाषा शिकणं अनिवार्य असेल. यातील दोन भाषा देशाच्या मूळ भाषा असाव्यात. त्यावेळी अण्णामलाई यांनी केंद्राच्या निर्णयचं स्वागत केलं होतं.
अण्णामलाई हे भाजप आणि AIADMKच्या युतीवरही नाराज होते. दरम्यान तमिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात त्यांनी एनडीएच्या उमेदवारांचा प्रचार मोठ्या उत्साहाने केला होता. परंतु त्याच्या आधी अण्णामलाई यांना तमिळनाडूच्या अध्यक्षपदावरून हटवण्यात आलं होतं. त्यांच्याजागी नैनार नागेंद्रेन यांना अध्यक्ष बनवण्यात आले होते. परंतु विधानसभा निवडणुकीत भाजपची कामगिरी साधरण राहिली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.