annamalai resignation  Saam tv
देश विदेश

भाजपला मोठा हादरा; दिग्गज नेत्याने पक्ष सोडला, नव्या पक्षाची करणार घोषणा

annamalai resignation : भाजपला मोठा हादरा बसला आहे. तामिळनाडूमधील दिग्गज नेत्याने पक्ष सोडला.

Vishal Gangurde

भाजपला मोठा धक्का बसला

अन्नामलाई यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय

अन्नामलाई यांनी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांकडे सोपवल्याची माहिती

भाजपला मोठा हादरा बसला आहे. भाजपचे वरिष्ठ नेते अन्नामलाई यांनी भारतीय जनता पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. तामिळनाडूचे भाजप प्रदेशाध्यक्ष अन्नामलाई यांनी पक्षातील पदाचा राजीनामा राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची भेट घेऊन राजीनामा सोपवला.

काही महिन्यांपूर्वी अन्नामलाई यांना तामिळनाडूच्या भाजप प्रदेशाध्यक्षपदावरून हटवलं होतं. त्यांच्याजागी नैनार नागेंद्रन यांची नियुक्ती करण्यात आली होती. भाजपमध्ये कोणतही भविष्य दिसत नसल्याचे भाष्य अन्नामलाई यांनी केलं होतं. त्यांनी स्वत:च पक्षातून बाहेर पडणार असल्याचे सांगितल होते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसर, अन्नामलाई यांची भाजप अध्यक्ष नितीन नबीन आणि संघटन सचिव बी. एल. संतोष यांच्यासोबत एक बैठक झाली. या बैठकीत अन्नामलाई यांनी दोन्ही नेत्यांना भाजपमधून बाहेर पडणार असल्याचे सांगितले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अन्नामलाई यांची तामिळनाडूत नवा पक्ष स्थापन करण्याची इच्छा आहे. परंतु भाजपचे वरिष्ठ नेत्यांकडू आताही माजी आयपीएस अधिकारी अन्नामलाई यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही. वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा झाल्यावर दिल्ली सोडण्याचा संदेश त्यांना देण्यात आला आहे.

अन्नामलाई यांची भाजपवर नाराजी आणि नव्या पक्षाची घोषणा करणार असल्याची चर्चा आहे. या चर्चेदरम्यान ते येत्या दोन दिवसांत भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे. अन्नामलाई यांनी चेन्नई विमानतळावरून दिल्लीला जाताना माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दोन दिवसांत भूमिका स्पष्ट करणार असल्याचे जाहीर केले.

तत्पूर्वी, अन्नामलाई यांनी सीबीएसईद्वारे (CBSE) शैक्षणिक वर्ष इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांना त्रिभाषा धोरण लागू करण्याच्या घोषणेला विरोध केला होता. तसेच त्यांनी केंद्र सरकारकडे अधिसूचना मागे घेण्याची मागणी केली होती. त्यांच्या या भूमिकेमुळे पक्षाशी मतभेद झाल्याची चर्चा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: विनायक राऊत आणि गितेश राऊत यांच्या अडचणीत वाढ

High Court : महिलेची सलवार काढणे अन् छातीला स्पर्श करणे बलात्काराचा प्रयत्न नाही; हायकोर्टाची टिप्पणी

Crime News: नागपूर हादरले! विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार, अश्लिल व्हिडीओ बनवून व्हायरल करण्याची धमकी

घरातली लोक झोपलेली, दाराची कडी लावली अन् स्मार्ट मीटर बसवून गेले; महावितरणचा गजब कारभार

कांद्याची झणझणीत भाजी; अवघ्या १५ मिनिटांत करा ही चवदार रेसिपी

SCROLL FOR NEXT