भाजप देशातील सर्वात श्रीमंत राजकीय पक्ष ठरला
भाजपकडे ६,९०० कोटी रुपयांहून अधिक निधी
काँग्रेसकडे फक्त ५३ कोटी रुपयांचा निधी
देशातील राजकीय पक्षांमध्ये भाजप हा सर्वात श्रीमंत पक्ष म्हणून उद्यास आलाय. भाजपकडे जवळपास ६ हजार कोटी रुपयांच्या ठेवी असल्याची बाब समोर आलीय.दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या आर्थिक तपशीलांमध्ये देशातील प्रमुख पक्षांच्या आर्थिक स्थितीत मोठा फरक दिसून आलाय.
या तपशीलानुसार केंद्रात आणि आता दिल्लीतील सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाकडे ६,९०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या बँक ठेवी आहेत. तर देशातील सर्वात जुना पक्ष असलेल्या काँग्रेसकडे पक्षाचे मुख्यालय आणि राज्य आणि जिल्हा युनिट्ससह फक्त ५३ कोटी रुपयांचा निधी आहे.
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, मनोरंजक वस्तुस्थिती अशी आहे की मर्यादित निवडणुका लढवूनही बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) खात्यात ५८० कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या ठेवी आहेत. यावरून हे स्पष्ट होतं की, निवडणुकीतील कामगिरी आणि पक्षाच्या आर्थिक स्थितीत काहीच थेट संबंध नसतो.
निवडणूक आयोगाला सादर केलेल्या माहितीनुसार, आम आदमी पक्षाच्या (आप) केंद्रीय युनिटकडे ९.९ कोटी आहेत.
भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवाद) (CPM) कडे ४ कोटी रुपये
भारतीय कम्युनिस्ट पार्टी - (CPI) कडे ४१ लाख रुपये तर
बीएसपीकडे ५८० कोटी रुपये असल्याचा तपशील निवडणूक आयोकगाकडे देण्यात आलाय. दरम्यान हे आकडे दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर विविध पक्षांनी भारतीय निवडणूक आयोगाला दिलेल्या बँक बॅलन्स स्टेटमेंटवर आधारित आहेत.
दरम्यान २४ ऑक्टोबर रोजी निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या योगदान विवरणपत्रात काँग्रेस पक्षाला २०२४-२५ आर्थिक वर्षात ५१७ कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या होत्या. या रकमेत २०,००० रुपयांपेक्षा जास्त वैयक्तिक देणग्यांचा समावेश आहे. त्यामुळे त्याला कायद्यानं ते सार्वजनिक करणं अनिवार्य असतं. दरम्यान राजकीय पक्ष हे २०,००० रुपयांच्या देणग्याची माहिती जाहीर करत नाहीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.