PM Modi, Nitish Kumar and Chandrababu Naidu  Saam Tv
देश विदेश

Assembly Election: विधानसभा निवडणुकांनंतर NDAला हादरा! नितीश कुमार देणार 'जोर का झटका', नेमकं राजकारण काय?

NDA Government News: देशाच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर ही परिस्थिती उद्भवू शकते.

Gangappa Pujari

देशाच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर ही परिस्थिती उद्भवू शकते. भाजपने हरियाणा आणि महाराष्ट्र गमावल्यास, विरोधकांना नवीन मार्गाने आपली सत्ता मजबूत करण्याची संधी मिळेल. झारखंडमध्ये सत्तेत येण्यासाठी भाजप जे कष्ट करत आहे, त्याचे फळ मिळाले नाही, तर विरोधकांची ताकद वाढणार आहे. अशा परिस्थितीत भाजपसोबत सध्या सत्तेत असणारे पक्ष, ज्यांची विचारधारा वेगळी आहे, मात्र नाईलाजाने सत्तेत बसलेत असे नेते भाजपला धक्का देऊ शकतात.

अशा पक्षांमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील जनता दल युनायटेड (जेडीयू), लोक जनशक्ती पार्टी-आर (एलजेपी-आर) आणि तेलुगू देसम पार्टी (टीडीपी) यांचा समावेश आहे. या तिन्ही पक्षांच्या पाठिंब्यावर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीएचे सरकार केंद्रात चालत आहे. वेळोवेळी या पक्षांनीही भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. टीडीपीने यापूर्वी अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता.

2014 मध्ये टीडीपीने भाजपशी हातमिळवणी केली, परंतु 2019 मध्ये ते भाजपचे कट्टर विरोधक बनले. टीडीपी सध्या भाजपसोबत आहे. LJP-R देखील सध्या भाजपचा मित्रपक्ष आहे. पण, त्याचा नेता चिराग पासवानच्या भूमिका बदलताना दिसत आहेत. जेडीयू नेते नितीश कुमार हे तर पलटूराम म्हणूनच ओळखले जातात, त्यामुळे ते कधीही धक्का देऊ शकतात.

अशा परिस्थितीत इंडिया आघाडीकडून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना पहिले लक्ष्य केले जाणार आहे. इंडिया आघाडीने त्यांना पंतप्रधानपदाचा प्रस्ताव आधीच दिला आहे. जेडीयूचे प्रवक्ते असताना केसी त्यागी यांनीच हे सांगितले होते. मात्र, त्यानंतर नितीशकुमार यांनी मौन बाळगले आणि भाजपसोब गेले. आतापर्यंत त्यांच्याकडून या संदर्भात कोणतेही संकेत मिळालेले नाहीत, परंतु जेडीयूचे लोक ज्या प्रकारे त्यांना पंतप्रधापदाचा दावेदार म्हणत आहेत, ते पाहता संधी मिळाल्यास ते मागे हटणार नाहीत असे दिसते.

याचे आणखी एक मोठे कारण म्हणजे 2020 च्या विधानसभा निवडणुकीत चिराग पासवान यांच्यामुळे जेव्हा नितीश कुमार यांना मोठा धक्का बसला तेव्हा त्यांनी 43 आमदार असलेल्या पक्षाचे नेते असल्यामुळे मुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास नकार दिला. मात्र, २४ तासांतच त्यांनी आपला निर्णय बदलला. अशातच नितीश कुमार यांना जर खरोखरच इंडिया आघाडीकडून पंतप्रधान बनवण्याची ऑफर मिळाली तर ते ते नाकारू शकणार नाहीत. मात्र त्यासाठी तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव व्हावा लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Washim Accident: वाशिममध्ये भीषण अपघात! १३ चिमुकल्यांना घेऊन जाणारी व्हॅन खड्ड्यात पलटली अन् पुढे...

katrina kaif: कतरिना कैफपूर्वी ‘या’ अभिनेत्रींनी चाळीशीत घेतलेला आई होण्याचा निर्णय

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये आदिवासींची महापंचायत

Virat Kohli: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सीरीज खेळण्यास किंग कोहलीचा नकार, वनडे क्रिकेटमधून विराट घेणार निवृत्ती?

Breaking : मोठी बातमी! लडाख हिंसाचारात ४ जणांचा मृत्यू; अखेर सोनम वांगचुक यांना अटक, इंटरनेट सेवाही बंद

SCROLL FOR NEXT