पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्याच्या मतदानावेळी गोंधळ
भाजप उमेदवारावर जीवघेणा हल्ला
एका पोलिंग एजंटवरही २० जणांचा हल्ला
पश्चिम बंगालच्या राजकीय वर्तुळातून मोठी बातमी हाती आहे. पश्चिम बंगालच्या परगनामध्ये भाजप उमेदवारावर हल्ला झाल्याची घटना घडली. त्यानंतर उमेदवाराच्या ताफ्यातील गाड्या फोडण्यात आल्याचेही समोर आलं आहे. सुरक्षा रक्षकाजवळील शस्त्रे देखील हिसकावण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेने पश्चिम बंगालच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचं मतदान आज बुधवारी पार पडत आहे. या निवडणुकीसाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने जोर लावला आहे. तर भाजपनेही या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याच्या मतदानादरम्यान बसंती मतदारसंघातील भाजप उमेदवार विकास सरदार यांच्यावरही हल्ला झाल्याची घटना घडल्याचे समोर आलं आहे.
भाजप उमेदवार विकास सरदार यांनी टीएमसी कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप केला आहे. भाजप उमेदवार विकास सरदार यांनी म्हटलं की, 'विधानसभा मतदारसंघात प्रत्येक ठिकाणी टीएमसी कार्यकर्त्यांची गुंडागर्दी पाहायला मिळत आहे. २००-२५० टीएमसी कार्यकर्त्यांनी रॉड आणि बांबूने माझ्या कारवर हल्ला केला. त्यांनी माझ्या कार चालकाला देखील मारहाण केली'.
तत्पूर्वी, भाजप उमेदवारानंतर पोलिंग एजंटवरही हल्ला झाल्याची घटना घडली आहे. पश्चिम बंगालच्या छपरा विधानसभा मतदारसंघातील हत्रा पंचायत बूथ क्रमांक ५२ मधील भाजपच्या पोलिंग एजंट मोर्शर्रफ मीर यांच्यावर हल्ला झाला. त्यांनी म्हटलं की, 'तिकडे टीएमसी कार्यकर्ते लपले होते. त्यांच्या विरोधात अनेक गुन्हा दाखल आहेत. २-३ कार्यकर्त्याकडे एक बंदूक होती. माझ्याजवळ १५-२० जणांचा जमाव आला. त्यानंतर लोखंडाच्या रॉडने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांच्या मारहाणीत मी खाली पडलो. त्यानंतरही मला मारहाण करत होते. माझ्या सोबत असलेल्या लोकांवरही हल्ला झाला'.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.