Lok Sabha Election 2024 Saam tv
देश विदेश

Bihar Firing : भाजप उमेदवाराच्या ताफ्यावर गोळीबार, बिहारमधील खळबळजनक घटना

firing bjp candidate in bihar : बिहारच्या पाटलीपुत्र लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार रामकृपाल यादव यांच्या ताफ्यावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

Vishal Gangurde

बिहार : बिहारच्या पाटणामधील पाटलीपुत्र लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार रामकृपाल यादव यांच्या ताफ्यावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. बिहारच्या पाटणामधील पाटलीपुत्र लोकसभा मतदारसंघातील मसौढी येथील तनेरी भागात ही गोळीबाराची घटना घडली आहे. या घटनेने मतदारसंघात एकच खळबळ उडाली आहे.

भाजप उमेदवार रामकृपाल यादव हे पाटलीपुत्र लोकसभा मतदारसंघातून मीसा भारती यांच्या विरोधात निवडणूक लढत आहेत. काही दिवसांपूर्वी एका रॅलीत त्यांनी लालू प्रसाद यांच्या कुटुंबावर टीका केली होती. तसेच मीसा भारती यांच्यावर आरोप करत निशाणा साधला होता. रामकृपाल यादव म्हणाले होते की, मिसा भारती यांनी खासदार कोट्यातून १५ कोटी रुपये मंजूर करून त्यातीत अधिक काम नांलदा या भागात केले. पण त्यांनी पाटलीपुत्र भागात काम केलं नाही.

'मिसा भारती यांना निवडणूक आयोगाच्या भौगोलिक क्षेत्राचीही माहिती नाही, अशी टीका रामकृपाल यांनी केली. तसेच यावेळी त्यांनी भावनिक साद देखील घातली. रामकृपाल यांनी दावा केला की, पंतप्रधान मोदी आणि नितीश कुमार यांनी एकत्र काम सुरु केल्याने विकासाची गंगा मतदारसंघात वाहत आहे'. त्याचबरोबर राष्ट्रीय जनता दल हा पक्ष नसून कौटुंबिक पक्ष आहे, अशी टीका देखील रामकृपाल यादव यांनी केली.

बिहारमध्ये कुणाची जादू चालणार?

दरम्यान, बिहारमध्ये नितीश कुमार आणि भाजपने युती केली आहे. यामुळे बिहारमध्ये कोण बाजी मारणार आहे, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. इंडिया टुडे एक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलमध्ये एनडीएला २९ ते ३३ जागा दाखवण्यात येत आहेत. तर इंडिया आघाडीला ७ ते १० जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत.

इतर एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, भाजपला १३-१५ जागा, जेडीयू ९ ते ११ , चिराग पासवान यांचा पक्ष एलजेपीआर यांच्या पक्षाला ५ जागा दाखवण्यात येत आहेत. इंडिया आघाडीच्या जागा पाहिल्या तर आरजेडीला ६-७, काँग्रेसला १-२ जागा दाखवण्यात येत आहेत. इतर पक्षांना ० ते २ जागा मिळण्याची शक्यता आहे, असा अंदाज इंडिया टुडे अॅक्सिस माय इंडियाने दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Narayan Rane : महायुती आणि उद्धव ठाकरेंचे किती उमेदवार निवडून येतील? नारायण राणेंनी थेट आकडाच सांगितला

Maharashtra News Live Updates: अपक्ष उमेदवार महेश गायकवाड यांचा भाजप आणि पोलिसांवर गंभीर आरोप

Diljit Dosanjh: दारूबंदी करा मग गाण्यांवर बंदी घाला, दिलजीत दोसांजचं सरकारच्या नोटिशीला उत्तर, काय आहे प्रकरण?

Pitbull And Ieopard Fight: पिटबूल आणि बिबट्यामध्ये थरारक झुंज; दोघे एकमेकांवर पडले भारी, अंगावर काटा आणणारा व्हिडिओ पाहिलात का?

VIDEO : शिंदे आणि केदार दिघंचे कार्यकर्ते आमने-सामने, कोपरी पाचपाखाडीत गोंधळ

SCROLL FOR NEXT