karnataka Political News Saam tv
देश विदेश

Political News : निवडणूक बिहारमध्ये अन् उलथापालथ दुसऱ्या राज्यात, थेट मुख्यमंत्री बदलणार? भाजप नेत्याचा मोठा दावा

Political News update : निवडणूक बिहारमध्ये असताना उलथापालथ दुसऱ्या राज्यात होणार असल्याचा दावा भाजपच्या नेत्याने केला आहे. भाजप नेत्याच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडालीये.

Vishal Gangurde

विजयेंद्र यांनी कर्नाटकात मुख्यमंत्री बदल होण्याचा दावा केलाय

काँग्रेस पक्षामध्ये अंतर्गत मतभेद आणि गोंधळ असल्याचाही त्यांनी दावा केला

काँग्रेस आमदार आणि मंत्र्यांनी सत्तांतराची शक्यता उघडपणे केली व्यक्त

कर्नाटकचे भाजप अध्यक्ष बीवाई विजयेंद्र यांनी बिहार निवडणुकीनंतर कर्नाटकात मोठ्या राजकीय घडामोडीवर होणार आहे. त्यांनी कर्नाटकात मुख्यमंत्री बदलणार असल्याचा दावा केला आहे. विजयेंद्र यांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

विजयेंद्र यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी विजयेंद्र म्हणाले, 'काँग्रेस पक्ष संभ्रमात आहे. पक्षातील आमदार बदलाच्या मानसिकतेत आहे. त्यात सिद्धारमैया गडबडीत दिसत आहे. त्यांनी दोन महिन्यांपूर्वी राजकीय शक्तीचं शक्तिप्रदर्शन केलं. दुसरीकडे सत्ताधारी काँग्रेसचे आमदार आणि मंत्री उघडपणे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये सत्तांतराची भाषा बोलत आहे. परंतु भाजपने काही म्हणालं नाही'.

त्यांनी पुढे सांगितलं की, 'काँग्रेसचे महासचिव केसी वेणुगोपाल यांनी पक्षातील नेत्यांना नेतृत्व बदलाविषयी कोणतंही भाष्य न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. काँग्रेस नेते नेतृत्व बदलणार नसल्याचे बोलत नाहीये. याचा अर्थ असा आहे की, बिहार निवडणुकीनंतर कर्नाटककात मोठे राजकीय बदल होतील'.

'सत्ताधारी पक्ष संभ्रमात आहे. मागील आठवड्यात काँग्रेसचे आमदार एचडी रंगनाथ आणि माजी खासदार शिवरामे गौडा यांनी मुख्यमंत्री बदलण्याचा दावा केल्याने राजकीय चर्चांना उधाण आलंय. शिवकुमार नोव्हेंबरमध्ये नवे मुख्यमंत्री होतील, असा दावा केला आहे. परंतु सिद्धारमैया यांनी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार असल्याचा दावा केला आहे.

सिद्धारमैया यांनी म्हटलं होतं की, दुसऱ्या कार्यकाळात मुख्यमंत्रिपदचाचे अडीच वर्ष झाले आहेत. पुढील अडीच वर्षही मुख्यमंत्री म्हणून राहील'. यावर विजयेंद्र यांनी म्हटलं की, 'जेव्हा बदल होईल, तेव्हा पाहता येईल. भाजप एक जबाबदार पक्ष म्हणून विरोधी पक्षाचं काम करत आहे आणि पुढेही करत राहणार आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Coins Found: समुद्रात सापडला खजिना, सोनं, चांदीच्या नाण्यांचा पेटारा

IIIT Pune Vacancy: पुण्यातील IIITमध्ये नोकरीची संधी; कुठे कराल अर्ज, जाणून घ्या सर्व तपशील

Cough Syrup: मुलांना कफ सिरप देताय? सावधान! खोकल्याचं औषध की विष?

Maharashtra Live News Update: 26 त्र्यंबकेश्वरातील प्रवेश कर कायमस्वरूपी रद्द; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाशिकमध्ये घोषणा

Kamaltai Gawai : एकजीव आणि सक्षम राष्ट्र निर्माण करायला हवं; कमलताई गवईंनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला काय सल्ला दिला?

SCROLL FOR NEXT