Maharashtra Politics : राजकीय समीकरण बदलणार; बदलापुरातील बड्या नेत्याची भाजपमध्ये एन्ट्री

badlapur Politics : बदलापुरातील राजकीय समीकरण बदलणार आहे. बदलापुरात बड्या नेत्याची भाजपमध्ये एन्ट्री झाली आहे.
badlapur Politics
Maharashtra Politics Saam tv
Published On
Summary

बदलापुरात राजकीय समीकरण बदलणार

शैलेश वडनेरे यांचा भाजपमध्ये प्रवेश

वडनेरे यांचा आमदार किसन कथोरे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे दिला होता पक्षाचा राजीनामा

मयूरेश कडव, साम टीव्ही

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदलापुरात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष शैलनेश वडनेरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. वडनेरे यांनी आमदार किसन कथोरे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

बदलापूरमधील माजी नगरसेवक आणि राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष शैलेश वडनेरे यांनी आज आमदार किसन कथोरे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी आमदार कथोरे यांनी त्यांचं पक्षात स्वागत केलं. शैलेश वडनेरे हे पूर्वी शिवसेनेत कार्यरत होते. विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या शहराध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली होती.

badlapur Politics
Viral News : आईच्या पश्चात पिलांना मायेची ऊब देणारा कोंबडा; पिलांचं सांभाळ करणाऱ्या कोंबड्यांचे कौतुक

राष्ट्रवादी पक्षाकडून विधानसभेचं तिकीट न मिळाल्यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभा निवडणूक लढवली होती. यानंतर वर्षभराने त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. विशेष म्हणजे त्यांनी ज्यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती, त्या आमदार किसन कथोरे यांनीच त्यांचं भारतीय जनता पार्टीत स्वागत केलं.

badlapur Politics
Adani Group : अदानींच्या कंपनीला आयकर विभागाचा दणका; ठोठावला तब्बल २३ कोटींचा दंड, नेमकं प्रकरण?

वडनेरेंनी केला होता राष्ट्रवादीवर गंभीर आरोप

मुरबाड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी शैलेश वडनेरे इच्छुक होते. मात्र, शरद पवार गटाकडून शैलेश वडनेरे यांना उमेदवारी मिळाली नाही. त्यानंतर त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला होता. लोकसभेत निर्णायक मते देऊन विजय मिळवून देणाऱ्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना डावलले जात असल्याचाही त्यांनी आरोप केला होता.

badlapur Politics
Shocking : धक्कादायक! पाणीपुरी खाल्ल्याने एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

त्यानंतर शैलेश वडनेरे यांनी अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, या निवडणुकीत वडनेरे यांचा दारुण पराभव झाला होता. मात्र, शैलेश वडनेरे यांनी आज रविवारी भाजप आमदार किसन कथोरे यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com