Shocking : धक्कादायक! पाणीपुरी खाल्ल्याने एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

Bihar Shocking : पाणीपुरी खाल्ल्याने एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झालाय. या घटनेने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
Bihar Shocking news
Bihar Shocking Saam tv
Published On
Summary

पटनामध्ये पाणीपुरी खाल्ल्यानंतर एका कुटुंबातील तिघांचा मृत्यू

मृतांमध्ये वडील आणि त्यांचे दोन लहान मुलांचा समावेश

जत्रेत पाणीपुरी खाल्ल्यानंतर तब्येत बिघडली

पोलिसांनी तपास सुरू केला

बिहारची राजधानी असलेल्या पटनामधून धक्कादायक वृत्त हाती आलं आहे. एकाच कुटुंबातील तिघांचा एका पाठोपाठ मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृतांमध्ये दोन भाऊ आणि वडिलांचा समावेश आहे. तिघांच्या मृत्यूने परिसरात खळबळ उडाली आहे. तिघांच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे.

मिळलेल्या माहितीनुसार, पटनाच्या पालीगंज अनुमंडलच्या सीगोरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील करहरा गावात तिघांच्या मृत्यूची दुर्दैवी घटना घडली. कुटुंबातील तिघांची तब्येत अचानक बिघडली. त्यामुळे तिघांनी परिसरातील डॉक्टरांकडून उपचार घेण्यास सुरुवात केली. याचदरम्यान कुटुंबातील एका मुलाचा मृत्यू झाला.

नेमकं काय घडलं?

मृतकाच्या नातेवाईकांनी सांगितलं की, तिघे पालीगंज येथील चंदौस येथील जत्रेत गेले होते. जत्रेत सर्वत्र फिरल्यानंतर तिघांनी एका ठिकाणी पाणीपुरी खाल्ली. घरी आल्यानंतर पाणीपुरी खालेल्या तिघांनी घरी येऊन जेवण केलं. रात्री अचानक तिघांच्या पोटात दु:खू लागलं. यामुळे तिघांची तब्येत बिघडली. तिघांपैकी एकाचा घरातच मृत्यू झाला.

Bihar Shocking news
Maharashtra Politics : ऐन दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदेंचा झटका; दोन बड्या नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश

नातेवाईकांनी नीरज आणि निर्भय कुमार या दोघांना पालीगंज अनुमंडल रुग्णालयात दाखल केलं. मात्र, पुढील उपचारासाठी दोघांना पीएमसीएच रुग्णालयात हलवण्यात आलं. दुसऱ्या दिवशी सकाळी या दोघांचा मृत्यू झाला.

Bihar Shocking news
Adani Group : अदानींच्या कंपनीला आयकर विभागाचा दणका; ठोठावला तब्बल २३ कोटींचा दंड, नेमकं प्रकरण?

नीरज साव असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर निर्मल कुमार (वय ८) आणि निर्भय कुमार (४) असे मृत्यू झालेल्या दोन्ही भावांचं नाव आहे. तिघांच्या मृत्यूने गावावर शोककळा पसरली आहे. या घटनेबाबत अद्याप सविस्तर माहिती समोर आलेली नाही. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि एफएसएलच्या टीमने तपासाला सुरुवात केली आहे.

Q

पटना येथे काय घटना घडली?

A

एका कुटुंबातील वडील आणि दोन मुलांचा पाणीपुरी खाल्ल्यानंतर मृत्यू झाल्याची घटना घडली.

Q

मृत व्यक्तींची नावे काय आहेत?

A

वडील नीरज साव, त्यांची दोन मुलं निर्मल कुमार (८) आणि निर्भय कुमार (४) यांचा मृत्यू झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com