eknath shinde news update
eknath shinde news Saam tv

Maharashtra Politics : ऐन दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदेंचा झटका; दोन बड्या नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश

Maharashtra Political News : ऐन दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदेंनी झटका दिलाय. दोन बड्या नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय.
Published on
Summary

दोन माजी आमदारांचा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पक्षप्रवेश

राजन तेली (सिंधुदुर्ग) आणि अण्णासाहेब माने (गंगापूर) यांनी शिंदे गटात प्रवेश केलाय

उद्धव ठाकरे यांना दसरा मेळाव्याच्या दिवशी मोठा राजकीय धक्का

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. राज्यातील विविध भागात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने बैठकांचा सपाटा लावला आहे. या निवडणुकीच्या आधी आयोजित दसरा मेळाव्याच्या दिवशी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला आहे. दसरा मेळाव्याच्या दिवशी माजी आमदार राजन तेली आणि माजी आमदार अण्णासाहेब माने यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. दोन्ही माजी आमदारांच्या शिवसेना पक्षप्रवेशामुळे एकनाथ शिंदे यांची ताकद वाढल्याची चर्चा सुरु झाली आहे.

eknath shinde news update
Uddhav Thackeray : दसरा मेळाव्याच्या दिवशी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; बडा नेता धनुष्यबाण हाती घेणार

आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी राजकीय पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी सुरु झाली आहे. तर काही राजकीय नेत्यांकडून मतदारसंघात मोर्चेबांधणी सुरु आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आगामी निवडणुकीसाठी मोठी फिल्डिंग लावल्याचं दिसत आहे. एकनाथ शिंदे यांनी छत्रपती संभाजीनगर आणि सिंधुदुर्गात मोठे झटके दिले आहेत.

eknath shinde news update
Eknath Shinde : बाळासाहेब असते तर...; दसरा मेळाव्यात शिवसेना फुटीवर एकनाथ शिंदेंचं मोठं विधान

छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूरमधील माजी आमदार अण्णासाहेब माने आणि सिंधुदुर्गातील राजन तेली यांनी एकनात शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. दोन्ही नेत्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. दोन्ही नेत्यांना प्रवेश देऊन एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्याच्या दिवशी उद्धव ठाकरेंना मोठा झटका दिला आहे.

Q

दसरा मेळाव्याच्या दिवशी एकनाथ शिंदेंनी कोणता राजकीय डाव टाकला?

A

एकनाथ शिंदे यांनी माजी आमदार राजन तेली आणि अण्णासाहेब माने यांना शिवसेनेत प्रवेश दिला.

Q

दोन्ही नेते कोणत्या भागातील आहेत?

A

अण्णासाहेब माने हे छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूरचे माजी आमदार आहेत. तर राजन तेली हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकरे गटाचे नेते आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com