Bilkis Bano case Saam TV
देश विदेश

Bilkis Bano Case News: 'दोषींना अगोदर का सोडले?' बिल्किस बानो प्रकरणावरुन सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे; गुजरात सरकारला सुनावले खडेबोल

बिल्किस बानो सामुहिक बलात्कार प्रकरणातील एकूण ११ गुन्हेगारांना शिक्षा सुनावण्यात आली होती.

Shivaji Kale

Supreme Court On Bilkis Bano Case: बिल्किस बानो सामुहिक बलात्कार प्रकरणातील गुन्हेगारांची गेल्या वर्षी पॅरोलवर मुक्तता करण्यात आली. गुजरात (Gujrat) सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे पडसात देशभर उमटल्याचं पाहायला मिळाले. बिल्किस बानो सामुहिक बलात्कार प्रकरणातील एकूण ११ गुन्हेगारांना शिक्षा सुनावण्यात आली होती.

मात्र, गुजरात सरकारने ही शिक्षा पूर्ण होण्याआधीच या गुन्हेगारांना १५ ऑगस्ट २०२२ रोजी पॅरोलवर सोडलं. गुजरात सरकारच्या या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) दाखल याचिकेच्या सुनावणीवेळी न्यायालयाने गुजरात सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, बिल्किस बानो यांनी गुजरात सरकारच्या या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मंगळवारी (18 एप्रिल) न्यायमूर्ती के. एम. जोसेफ आणि न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना यांच्या खंडपीठासमोर या याचिकेची सुनावणी चालू आहे. यावेळी न्यायालयाने गुजरात सरकारला परखड शब्दांत सुनावले आहे. सफरचंदाची तुलना संत्र्याशी होऊ शकत नाही, त्याचप्रमाणे हत्याकांडाची तुलना एका हत्येशी होऊ शकत नाही, अस न्यायालयानं म्हटलं आहे.

बिल्किस बानो प्रकरणातील दोषींच्या सुटकेविरोधातील याचिकेवरील सुनावणीवेळी न्यायमूर्ती केम जोसेफ यांनी युक्तीवाद केला. यावेळी समाजावर मोठ्या प्रमाणावर परिणाम करणारे असे जघन्य गुन्हे घडतात, तेव्हा कोणत्याही अधिकाराचा वापर करताना सार्वजनिक हित लक्षात घेतलं पाहिजे, असे मत न्यायाधीशांनी व्यक्त केले.

तसेच या प्रकरणात पुढे बोलताना "आज बिल्किस बानो आहे, उद्या ते किंवा तुम्ही असू शकता, अशा परिस्थितीत निश्चित मानके असायला हवीत. जर तुम्ही आम्हाला कारण दिले नाही तर आम्ही आमचा स्वतःचा निष्कर्ष काढू," अशी टिप्पणी न्यायमूर्ती केम जोसेफ यांनी सुनावणी वेळी केली. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kanya Sumangala Yojana: लाडक्या लेकींना जन्मापासून मिळणार २५,००० रुपये, काय आहे सरकारची खास योजना?

Maharashtra News Live Update: कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा इथं जुन्या घराची भिंत कोसळली, तिघे गंभीर जखमी

Petrol Diesel Rate: महाराष्ट्रात पेट्रोल डिझेलच्या दरात बदल; मुंबई, पुण्यासह तुमच्या शहरातील दर किती?

Beed Crime: बीड हादरले! परळीत राष्ट्रवादीच्या नेत्यावर प्राणघातक हल्ला, ५ ते ६ जणांनी भररस्त्यात कोयत्याने केले सपासप वार

Deepika Padukone Latest News: सिनेसृष्टीपासून दूर राहून अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या नेमकी काय करतेय?

SCROLL FOR NEXT