chhatrapati sambhaji nagar News: नवी मुंबईतील खारघरमध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यातील दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेत प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे १३ जणांचा मृत्यू झाल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. तर विरोधी पक्षातील नेत्यांकडून सरकारवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. याचदरम्यान, या घटनेवरून एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी देखील शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. (Latest Marathi News)
खासदार इम्तियाज जलील यांनी गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यातील दुर्घटनेवरून गंभीर आरोप केला आहे.
जलील म्हणाले, '20 लाख अनुयायांच्या मतांसाठी गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 13 जणांची हत्या केली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी तीन तास उन्हात थांबवून दाखवा, मी 10 लाख रुपये देतो'.
दरम्यान, नवी मुंबईतील खारघरमध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यातील दुर्घटनेनंतर विरोधकांडून सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं जात आहे. तर दुसरीकडे राज्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अजित पवारांविषयी वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.अजित पवारांच्या हालचालींवरून राज्यात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप येणार असं म्हटलं जात आहे.
अजित पवारांच्या भाजपसोबत जाण्याच्या चर्चेवरून इम्तियाज जलील यांनीही भाष्य केलं आहे. '13 जणांचा बळी गेल्यानंतर त्यावर चर्चा होऊ नये म्हणून अजित पवारांचा विषय काढला गेला आहे, असा गंभीर आरोप इम्तियाज जलील यांनी केला आहे.
दरम्यान, महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यातील दुर्घटनेवरून राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे सरकाला पत्र लिहिलं आहे. 'या कार्यक्रमाचे आयोजन शासनाकडून करण्यात आले होते. ही दुर्देवी घटना नैसर्गिक आपत्ती नसून मानवनिर्मित आपत्ती आहे.
शासनाच्या नियोजन शून्य आयोजनामुळे निष्पाप अनुयायांचा बळी गेला आहे. या घटनेला आणि मूत्यूला पूर्णपणे सरकार जबाबदार आहे, असा आरोप अजित पवार यांनी केला आहे.
तसेच मृतांच्या नातेवाईकांना केवळ ५ लाख रुपयांची तुटपुंजी मदत करून सरकारने आपली जबाबदारी झटकू नये. प्रत्येक मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना २० लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी.
जखमीवर अनुयांयावर मोफत उपचार करुन त्यांना प्रत्येकी ५ लाखांची मदत करण्यात यावी, ही विनंती, अशी मागणीचं पत्र अजित पवार यांनी शिंदे सरकारला दिलं आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.