Fear Grips Village After Brutal Killing in Chapra Saam Tv
देश विदेश

दोन्ही डोळे बाहेर अन् गुप्तांगावर वार; तरूणाची क्रूर हत्या, बेडखाली रक्ताने माखलेला मृतदेह पाहून..

Fear Grips Village After Brutal Killing in Chapra: ५५ वर्षीय सूरज प्रसाद यांची अतिशय क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली आहे. मृतदेह बेडखाली रक्ताने माखलेला आढळल्याने परिसरात खळबळ.

Bhagyashree Kamble

बिहारमधील छपरा जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका व्यक्तीची अतिशय क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली आहे. पोलिसांना मांझी दक्षिण टोला येथील खोलीत बेडखाली त्या व्यक्तीचा रक्ताने माखलेला मृतदेह आढळला. आरोपींनी त्यांचे दोन्ही डोळे बाहेर काढले. तसेच गुप्तांग ठेचले असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच मृताची पत्नी, दोन मुले आणि तीन मुली घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे.

सूरज प्रसाद (वय वर्ष ५५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मृत व्यक्तीचा पुतण्या पंकज प्रसाद यांनी सांगितले की, सूरज प्रसाद सुमारे दहा वर्षांपासून गावाबाहेरील एका छोट्या खोलीत एकटेच राहत होते. त्यांच्या कुटुंबातील सदस्य छपरा शहरात वास्तव्यास आहे.

बुधवारी सकाळी त्यांच्या शेजारचे जेवण देण्यासाठी गेले होते. तेव्हा हे प्रकरण उघडकीस आलं. त्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली.

ही हत्या रात्रीच्या सुमारास झाली असल्याची माहिती आहे. सारणचे एसएसपी डॉ. कुमार आशिष म्हणाले की, या हत्येमागे नेमका कुणाचा हात आहे? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. लवकरच मारेकऱ्यांना पकडले जाईल, असं पोलिसांनी सांगितलं. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून काही नमुने गोळा केले आहेत. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवण्यात आले आहे. शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतर, काही गोष्टी उघड होतील, असं पोलीस म्हणाले.

दरम्यान, पोलीस जवळच्या रहिवाशांची चौकशी करत आहेत. या घटनेनंतर संपूर्ण परिसर हादरला असून, ग्रामस्थांनी भीती तसेच संताप व्यक्त केला आहे. पोलिसांनी आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crocodile Mummy Egypt: वैज्ञानिकांनी उघडलं ३००० वर्षांपूर्वीचं मगरीचं ममी; आत दडलेलं रहस्य जगाला थक्क करणारं

Surya Gochar: जानेवारीत सूर्य ग्रह करणार २ वेळा गोचर; 'या' राशींना लागणार जॅकपॉट, मिळणार भरपूर पैसा

Women Cricket History: भारताला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या महिला क्रिकेट संघाची सुरुवात कुठून झाली? जाणून घ्या इतिहास

Silver Price: इतिहासात पहिल्यांदाच चांदी २ लाखांच्या पार, सोनं महागलं, आता पुढे काय?

कल्याणमध्ये अपघाताचा थरार; बायकोला कामावरून घरी आणताना विपरीत घडलं, दुचाकीस्वार नवऱ्याचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT