bihar shocking news  Saam tv
देश विदेश

Shocking : जिगरी मित्रांनी गुपचूप किटकनाशक औषध प्यायलं; तिघांचा मृत्यू; एकाची मृत्यूशी झुंज

bihar shocking news : बिहारमधील ४ जिगरी मित्रांनी गुपचूप वावरात जाऊन किटकनाशक औषध प्यायल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत तिघांचा मृत्यू झाला.

Saam Tv

जिगरी मित्रांनी किटकनाश पिऊन आयुष्य संपवलं, तिघांचा मृत्यू

तिघांच्या मृत्यूने गावात खळबळ

पोलिसांकडून तपासाला सुरुवात

बिहारच्या सहरसा जिल्ह्यातून खळबळजनक घटना समोर आली आहे. चार जिगरी मित्रांनी गुपचूप शेतात जाऊन विष प्यायलं. या घटनेत तिघांचा मृत्यू झाला. एकाची प्रकृती गंभीर आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. तिचे नातेवाईक रडून रडून बेहाल झाले आहेत. पोलिसांनी या प्रकरणी तपासाला सुरुवात केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील कनरिया पोलीस स्टेशनच्या हद्दीत फरेवा मुसहरी गावात चार जिगरी किटकनाशक औषध प्यायल्याची घटना घडली. यात तिघांचा मृत्यू झाला आहे. राजा कुमार (२०),सनी देओल आणि अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला आहे. तर आणखी एका अल्पवयीन मुलाची प्रकृती नाजूक असल्याची माहिती मिळत आहे. चार जिगरी मित्र गावातील सांस्कृतिक कार्यक्रमात डान्स करायचे. या नाचकामातून चौघे कमाई करायचे.

चौघांनी शनिवारी दुकानात जाऊन किटकनाशक औषध खरेदी केलं. त्यानंतर चौघे जण गावातील मक्याच्या शेतात जाऊन आळीपाळीने किटकनाशक औषध प्यायलं. चौघांनी विष प्यायल्याचे कळताच परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. त्यांना रुग्णालयात दाखल करत असतानाच राजा, सनी आणि अल्पवयीन मुलाने जीव सोडला. तर एका अल्पवयीन मुलाची प्रकृती नाजूक असल्याची माहिती मिळत आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी एफएसएलची टीम देखील घटनास्थळी पोहोचली आहे. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. तपासात चौघांनी एकत्र किटकनाशक प्यायलं. चौघांनी इतके टोकाचं पाऊल का उचललं, याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: माणगावामध्ये गावठी दारूवर पोलिसांची कारवाई

Toenails Turn Black: पायांची नखं अचानक काळी-पिवळी पडतायत? जाणून घ्या यामागची ३ प्रमुख कारणे

दिवसभरात किती कॉफी पिऊ शकता? जास्त कॉफी प्यायल्यानं काय होतं?

Banana Storage : बाजारातून घरी आणल्यानंतर केळी लगेच काळी पडतात? जास्त दिवस ताजी राहावीत यासाठी करा 'हे' 6 सोपे उपाय

Return Gift Ideas: गणपतीच्या दर्शनाला येणाऱ्या पाहुण्यांसाठी 7 सुंदर गिफ्ट्स

SCROLL FOR NEXT