BIHAR BJP LEADER ABHIJEET SINGH RAJPUT SHOT DEAD IN SAHARSA saam tv
देश विदेश

भाजपच्या दिग्गज युवा नेत्यावर धाडधाड गोळ्या झाडल्या; राजकीय वर्तुळात खळबळ

Abhijeet Singh Rajput Shot Dead Inside His House In Bihar: बिहारमधील सहरसा येथे भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस अभिजीत सिंह राजपूत यांची घरातच गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. पोलिसांकडून हत्येचा तपास सुरू आहे.

Omkar Sonawane

बिहारमधील सहरसा जिल्ह्यात धक्कादायक हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस अभिजीत सिंह राजपूत यांची त्यांच्या घरातच गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उदलू असून, कुटुंबीय आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. सहरसा येथील वॉर्ड क्रमांक 15 मध्ये ही घटना घडली. 22 वर्षीय अभिजीत सिंह राजपूत, अशी मृत तरुणाची ओळख पटली आहे. त्यांचे वडील हर्षवर्धन सिंह यांचे यापूर्वीच निधन झाले आहे.

अभिजीत यांचा मृतदेह घरातील बंद खोलीत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. लिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, ही घटना रात्री दोन वाजल्यानंतर घडली असावी. अभिजीत यांच्या चेहऱ्यावर उशी ठेवलेली असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर गोळी झाडून त्यांची हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री अभिजीत एका पार्टीला गेले होते. पार्टीवरून घरी परतल्यानंतर काही वेळातच त्यांची हत्या झाल्याचा संशय आहे. सकाळी त्यांचा मित्र आर्यन घरी पोहोचला असता, घराच्या बाहेरील गेटला कुलूप असल्याचे त्याला दिसले. र्यनने खिडकीतून घरात पाहिले असता अभिजीत यांचा मृतदेह दिसून आला. त्यानंतर त्याने अभिजीत यांच्या भावाला याची माहिती दिली. त्यांचा भाऊ गावात राहत असल्याची माहिती आहे. दरम्यान, अभिजीत यांच्या हत्येप्रकरणी आर्यनवरच आरोप करण्यात येत असल्याचे वृत्त आहे. मात्र, या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.

पोलिसांकडून हत्येचे नेमके कारण आणि आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Blouse Design: ब्रायडल,रिसेप्शन आणि कॉकटेल पार्टीसाठी परफेक्ट; २०२६मध्ये ट्रेंडी आहेत ब्लाउजचे हे स्टायलिश डिझाइन्स

Raw amla vs amla juice : कच्चा आवळा की आवळा रस; आरोग्यासाठी कोणते अधिक फायदेशीर?

Maharashtra News Live Update: तुषार गांधींची ८ तासांनंतर मुंबई पोलिसांच्या ताब्यातून सुटका

दुष्काळ जाहीर, मदत अद्याप नाही; १५ दिवसांत शेतकऱ्याची पाचवी आत्महत्या

Amitabh Bachchan: ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना हायकोर्टात हजर राहण्याचे आदेश, ४ वर्षांपूर्वीचं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT