sushil kumar modi, Shivsena Uddhav Thackeray  Saam TV
देश विदेश

...म्हणून आम्ही शिवसेना फोडली; भाजपाच्या बड्या नेत्याचा तोंडी आले सत्य?

बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी एक मोठं विधान केलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

पटना : जेडीयूचे नेते नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी भाजपसोबत फारकत घेऊन युती तोडली. त्यानंतर त्यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सुपुर्द केला. नितीश कुमार यांच्या या धक्कातंत्रामुळे भाजपला (BJP) जोर का झटका लागला. नितीश कुमार फक्त एवढ्यावरच थांबले नाही तर, त्यांनी आरजेडी कॉंग्रेस आणि डाव्या पक्षांशी आघाडी करत सत्तास्थापनेचा दावा केलाय. अशातच, बिहारचे भाजप नेता आणि माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी एक मोठं विधान केलं आहे.

जेडीयू आणि नितीश कुमार यांनी बिहारचा विश्वासघात केला आहे. मतदारांनी दिलेल्या मतांशी खेळले आहेत, असा आरोप बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी केला आहे. इतकंच नाही तर, आज जे काही घडलं, ते बिहारच्या जनतेशी आणि भाजपसोबतचा विश्वासघात आहे. शिवसेनेने देखील महाराष्ट्रात असाच विश्वासघात केला होता, म्हणून आम्ही शिवसेना फोडली. ज्यांनी आमचा विश्वासघात केला त्यांनाच आम्ही तोडले. असं धक्कादायक विधानही सुशीलकुमार यांनी केलंय.

तीन पक्षांना सोबत घेऊन बिहारमध्ये नितीश कुमार सरकार स्थापन करणार आहेत. त्यामुळे पुढचे अडीच वर्ष भाजपला विरोधात बसावं लागणार आहे. बिहारमध्ये नितीशकुमार आज आठव्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. राजद, काँग्रेस आणि मांझी यांच्यासोबत आघाडी करून नितीशकुमार यांनी भाजपाला सत्तेतून बाहेरचा रस्ता दाखविला आहे.

भाजपाने जदयू फोडण्यासाठी ऑपरेशन लोटस चालविल्याचा आरोप नितीशकुमार यांनी केला आहे. यातून सावध होत त्यांनी पक्ष वाचविला, असा दावा केला आहे. असे असताना भाजपाने आपण महाराष्ट्रात शिवसेना का फो़डली हे सांगत नितीश कुमार यांना एकप्रकारे इशाराच दिला आहे.

2020 च्या बिहार विधानसभा निवडणुकीत आपण सर्वांनी NDA आघाडी अंतर्गत निवडणूक लढवली होती आणि जनतेने JDU आणि BJP ला पाठिंबा दिला होता. जेडीयूने बिहारचा विश्वासघात केला आहे. मतदारांनी दिलेल्या मतांशी खेळले आहेत, असा आरोप बिहारचे भाजपा नेता आणि माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी केला आहे.

आम्ही 74 जागा जिंकण्यात यशस्वी झालो, पण पंतप्रधानांनी दिलेले आश्वासन आम्ही पूर्ण केले आणि एनडीए आघाडीत नितीशकुमार मुख्यमंत्री झाले. पण आज जे काही घडले तो बिहारच्या जनतेशी आणि भाजपसोबतचा विश्वासघात आहे. शिवसेनेने देखील महाराष्ट्रात असाच विश्वासघात केला होता, म्हणून आम्ही शिवसेना फोडली. ज्यांनी आमचा विश्वासघात केला त्यांनाच आम्ही तोडले.असं सुशील कुमार यांनी म्हटलं आहे.

नितीश कुमार यांना राजदमध्ये तो आदर मिळणार नाही जो त्यांनी भाजपसोबत असताना मिळवला. आम्ही त्यांना अतिरिक्त जागा न घेता मुख्यमंत्री बनवले. अडथळा आणण्याचा प्रयत्न केला नाही, असेही सुशीलकुमार मोदी म्हणाले.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: तासगावमध्ये शरद पवारांची सभा, अजित पवारांच्या वक्तव्याचा समाचार घेणार का?

Gold Price Today: 5000 हजारांनी स्वस्त झाल्यानंतर सोन्याचे भाव वाढले; 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती?

Devendra Fadanvis : मी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान, पाहा Video

Ladki Bahin Yojana : ... तर याला मी लाच म्हणेल, लाडकी बहीण योजनेवर राज ठाकरे काय म्हणाले?

Praniti Shinde : भाजपचे आमदार फक्त जीआरवर, अस्तित्वात नाही; खासदार प्रणिती शिंदे यांची आमदार कल्याणशेट्टींवर टीका

SCROLL FOR NEXT