Crime : एका पोलीस अधिकाऱ्याने ई-रिक्षा चालकाला थुंकी चाटायला लावली. सुरुवातीला चालकाला शिवीगाळ, मारहाण करण्यात आली. अधिकाऱ्याने रिक्षाचालकाची जात विचारल्यानंतर त्याला थुंकी चाटायला लावली. हा किळसवाणा प्रकार बिहारच्या शेखपुरा जिल्ह्यातील मेहूस गावात घडला आहे. या प्रकरणामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
पीडित ई-रिक्षा चालक प्रद्युमन कुमार यांनी घटनेची माहिती दिली. 'मेहूस पोलीस स्टेशनचे प्रभारी प्रवीण चंद्र दिवाकर यांनी मला थांबवले. ते साध्या कपड्यात बाईकवर होते. त्यामुळे ते पोलीस असल्याचे सुरुवातीला मला समजले नाही. आमच्यामध्ये थोडासा वाद झाला. त्यांनी मला शिवीगाळ केली. दिवाकर यांनी पोलीस वाहन बोलावत मला अटक केली', असे प्रद्युमन कुमारने म्हटले.
'पोलीस वाहनात नेण्यापूर्वी दिवाकर यांनी मला रस्त्यावरच ५०-६० वेळा काठीने मारले. यामुळे मी गंभीर जखमा झाल्या. त्यांनी माझ्यावर मद्यप्राशन केल्याचा आरोप ठेवण्याचा प्रयत्न केला. पण वास न आल्याने दिवाक यांनी मारहाण सुरुच ठेवली आणि नंतर मला पोलीस ठाण्यात नेले. पोलीस ठाण्यात पोहोचल्यावर त्यांनी पुन्हा शिवीगाळ आणि मारहाण करायला सुरुवात केली', अशी माहिती कुमारने दिली.
दिवाकर यांनी प्रद्युमन कुमारची जात विचारली. यावर कुमार 'ब्राह्मण' असे म्हणाला. मला ब्राह्मण जातीचे लोक पाहायला आवडत नाही असे म्हणत दिवाकर जमिनीवर थुंकले. त्यांनी प्रद्युमन कुमार ते चाटायला लावले. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक आमदार सुदर्शन कुमार यांनी आरोपीवर कारवाई करण्याची मागणी केली. सध्या ई-रिक्षाचालक प्रद्युमन कुमार रुग्णालयात उपचार घेत आहे.
स्थानिकांनी प्रवीण चंद्र दिवाकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल व्हावा असे म्हटले. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरु करण्यात आला. तपासादरम्यान रिक्षाचालकाने केलेले आरोप खरे असल्याचे आढळले आहेत. प्रवीण चंद्र दिवाकर यांना निलंबित करण्यात आले आहे, असे पोलीस अधीक्षक बळीराम चौधरी यांनी म्हटले. दिवाकर यांनी त्यांच्यावरील आरोप निराधार असल्याचे म्हटले. रिक्षाचालक मुलींना छेडत होता असे दिवाकर यांचे मत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.