VIP Leader Mukesh Sahani Saam Tv
देश विदेश

Bihar News: बिहार हादरले! VIP नेत्याच्या वडिलांची घरात घुसून केली निर्घृण हत्या

Priya More

बिहारमधून (Bihar) धक्कादायक बातमी समोर येत आहे. बिहारमधील विकासशील इन्सान पार्टीचे म्हणजेच व्हीआयपीचे (VIP) प्रमुख मुकेश साहनी (Mukesh Sahni) यांच्या वडिलांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. काही अज्ञातांनी घरामध्ये घुसून मुकेश साहनी यांचे वडील जीतन साहनी यांच्यावर धारधार शस्त्रांनी प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. बिहारच्या दरभंगामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे बिहारमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जीतन साहनी यांचा मृतदेह दरभंगा येथील सुपौल बाजार येथील अफझला पंचायत येथील त्यांच्या राहत्या घरी आढळून आला. दरभंगा एसएसपी यांनी हत्येला दुजोरा दिला असून दरभंगा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला असून रक्ताच्या थारोळ्यामध्ये ते पडले होते. जीतन साहनी यांच्या हत्येचे नेमके कारण समोर आले नाही. पोलिसांकडून याचा तपास सुरू आहे.

मुकेश साहनी यांचे वडील जीतन साहनी दरभंगाच्या सुपौल बाजारच्या अफझला पंचायतीच्या बिरौलमध्ये राहत होते. जीतन साहनी गावातील घरामध्ये एकटेच राहत होता. त्यांना मुकेश साहनी आणि संतोष साहनी ही दोन मुले आहेत. याशिवाय त्यांना एक मुलगी असून ती मुंबईत राहते. घरामधील एका खोलीत जीतन साहनी यांचा मृतदेह आढळून आला असून घरातील सर्व सामान विखुरलेले पडले होते.

मुकेश साहनी हे विकासशील इन्सान पार्टीचे संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. ते बिहारमधील पशुसंवर्धन आणि मत्स्यसंपदा मंत्री राहिले आहेत. मुकेश साहनी यांची निषाद व्होट बँकेवर चांगली पकड आहे. २०१५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीत मुकेश साहनी यांनी भाजपचा प्रचार केला. पण नंतर त्यांनी विकासशील इन्सान पार्टीची स्थापना केली. यानंतर, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पक्ष महाआघाडीचा भाग बनला आणि ४ जागांवर निवडणूक लढवली. पण एकही जागा जिंकू शकला नाही.

२०२० च्या बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएचा भाग असलेल्या मुकेश साहनी यांच्या पक्षाने ११ जागा लढवल्या आणि ४ जागा जिंकल्या होत्या. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मुकेश साहनी यांचा पक्ष व्हीआयपी हा इंडीया आघडीचा एक भाग झआला होता. तीन लोकसभा जागांवर त्यांनी निवडणूक लढली होती. पण एकही जागा जिंकण्यात यश आले नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amravati Politics: यशोमती ठाकूर यांना कसला अंहकार? खासदार बोंडेंवरून वहिनीसाहेबांनी नणंदबाईंना भरला दम

Congress : भाईंदरमध्ये काँग्रेसचे भाजप विरोधात आंदोलन

Sindhudurg Fort : मुंबईहून सिंधुदुर्ग किल्ल्याला कसं जायचं?

मुंबई ते नागपूर एका चार्जमध्ये गाठते! 31 मिनिटात होते चार्ज, जबरदस्त आहे 'ही' इलेक्ट्रिक कार; जाणून घ्या किंमत

'Emergency'चा अंतिम निर्णय आठवड्याभरात घ्या, हायकोर्टाचे सेन्सॉर बोर्डाला निर्देश, कंगनाला दिलासा मिळणार का?

SCROLL FOR NEXT