Bihar Tragedy News  Saam tv
देश विदेश

Bihar Tragedy : क्षणात होत्याचं नव्हतं; घराला आग लागल्याने एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू

Bihar Tragedy News : घराला आग लागल्याने एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

Vishal Gangurde

मुझफ्फरपूरमध्ये शॉर्ट सर्किटमुळे घराला आग, एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू

आगीत आणखी ५ जण गंभीर जखमी, त्यांना रुग्णालयात केलं दाखल

अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी पोहोचून मिळवलं आगीवर नियंत्रण

आगीच्या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण

एकीकडे बिहार विधानसभा निवडणुकीचा जल्लोष सुरु असताना मुझफ्फरपूरमध्ये दुर्दैवी घटना घडली आहे. शहराच्या मोतीपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत वॉर्ड-१३ मध्ये एका घराला आग लागल्याची घटना घडली. या घराला लागलेल्या आगीत ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ५ लोक आगीत होरपळले आहेत. मृत्यू झालेले आणि आगीत जखमी झालेले लोक एकाच कुटुंबातील सदस्य आहेत. घरात शॉर्ट सर्किट झाल्याने घराला आग लागल्याचं बोललं जात आहे. या आगीत जखमी झालेल्या लोकांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

पोलीस अधिकारी सुचित्रा कुमारी यांनी सांगितलं की, घराला आग ही शॉर्ट सर्किट झाल्यामुळे लागली. अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी पोहोचत जखमींना आगीतून बाहेर काढलं. अग्निशमन दलाने अथक प्रयत्नाने आगीवर नियंत्रण मिळवलं. गेना साह यांच्या घराला ही आग लागली. आगीने रौद्ररुप धारण केल्याने क्षणात संपूर्ण घराला आग लागली. काही लोकांचा झोपेतच मृत्यू झाला. घरातील काही जखमींना स्थानिक आणि पोलिसांनी बाहेर काढलं.

घटनेत जखमी झालेल्या लोकांनी जवळील रुग्णालयात दाखल केलं. मृतांमध्ये ललन साह, त्यांची आई, पत्नी आणि २ मुलांचा समावेश आहे. एकाच कुटुंबातील पाच जणांच्या मृत्यूने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर लोक त्यांच्या घरातील वीज जोडणीची तपासणी आणि दुरुस्ती करण्यासाठी धावपळ करताना दिसत आहेत.

प्राथमिक तपासात ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची माहिती मिळाली. या प्रकरणाची सर्व बाजूने तपासणी केली जात आहे. पीडितांच्या नातेवाईकांना संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. एकाच कुटुंबातील ५ जणांचा आगीत मृत्यूने झाल्याने स्थानिक नागरिकांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यातील अनेक शाळांना आज सुट्टी

Mumbai Mayor : मुंबईचा महापौर दिल्लीत ठरणार, शेलार-साटम अन् शेवाळे राजधानीत, शिंदेंच्या मनात नेमकं काय?

SIP Calculator: दररोज फक्त १०० रुपये गुंतवा अन् ४ कोटी मिळवा; SIPचं कॅल्क्युलेशन वाचा

First step if phone hacked: तुमचा फोन हॅक झाला तर पहिली गोष्ट कोणती करावी? जाणून घ्या

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींसाठी खुशखबर! मंत्री आदिती तटकरेंनी केली मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT