bihar Self Help Allowance news Saam tv
देश विदेश

Self Help Allowance : बेरोजगारांना महिन्याला मिळणार १००० रुपये; निवडणुकीच्या तोंडावर नितीश सरकारची मोठी घोषणा

Self Help Allowance News : लाडक्या बहिणीनंतर बेरोजगारांना महिन्याला १००० रुपये मिळणार आहेत. नितीश सरकारने याबाबत मोठी घोषणा केली.

Vishal Gangurde

बिहार सरकारने तरुणांना मोठी खुशखबर दिली आहे. बिहारमधील पदवी पूर्ण केलेल्या सहाय्य भत्ता म्हणून महिला १००० रुपये दिले जाणार आहेत. आतापर्यंत ही योजना केवळ माध्यमिक शिक्षण पूर्ण झालेल्या लोकांना हा निर्णय लागू होता.

पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण असलेल्या बेरोजगारांना दोन वर्षांपर्यंत महिना एक हजार रुपये स्वयं सहाय्य भत्ता मिळणार आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ही माहिती दिली. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील पोस्टमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, 'बिहार सरकार अंतर्गत निश्चय स्वयंसहाय्यता भत्ता योजनेचा विस्तार करण्यात येत आहे. ही माहिती देताना आनंद होत आहे'.

कोणाला मिळणार लाभ?

योजनेअंतर्गत आधी माध्यमिक शिक्षण पूर्ण करणाऱ्यांना स्वयं सहाय्य भत्ता योजनेचा लाभ मिळत होता. मात्र, आता आर्ट्स, सायन्स किंवा कॉमर्स विषयातून पदवी मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांनाही आता या योजनेचा लाभ मिळणार आहे.

ही योजनेमुळे अनेक तरुणांना फायदा होणार आहे. २० ते २५ वयोगटातील अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तर काही जण सरकारी नोकरीची तयारी करत आहे. त्यांच्याकडे कोणताही स्वयंरोजगार नाही. ज्या तरुणांकडे सरकारी, खासगी किंवा कोणत्याही प्रकारचा रोजगार नाही. या तरुणांना जास्तीत जास्त दोन वर्षे मासिक १००० रुपये दिले जाणार आहेत.

मुख्यमंत्र्यांनी पोस्टमध्ये म्हटलं की, 'मला आशा आहे की, सहाय्य भत्त्याचा वापर हा आवश्यक प्रशिक्षण घेण्यासाठी आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी होईल. जेणेकरून त्यांचं भविष्य सुरक्षित होईल'.

'राज्य सरकारचा उपक्रम हा उद्दिष्ट राज्यातील तरुणांना जास्तीत जास्त रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देणे आहे. बिहारमधील तरुण स्वावलंबी, कुशल आणि रोजगाराभिमुख बनतात. या मदतीतून तरुण राज्याच्या आणि देशाच्या विकासात महत्वपूर्ण योगदान येऊ शकतात, असेही ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वाहनाचे इंजिन ऑइल खराब झाले हे कसं ओळखायचं? ही १ गोष्ट लक्षात ठेवा

Maharashtra News Live Update: सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल

Fort History : २६ वर्षे मराठा साम्राज्याची राजधानी, मुघलही थकले, पण जिंकू शकले नाहीत हा अभेद्य किल्ला

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

SCROLL FOR NEXT