Bihar Cabinet Ministers List Saam Tv
देश विदेश

Bihar Cabinet Ministers List: नितीश कुमार यांच्यासोबत २६ मंत्र्यांनी घेतली शपथ; वाचा संपूर्ण लिस्ट

Bihar Government: बिहारमध्ये एनडीएचे पुन्हा सराकर आहे. नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत २६ मंत्र्यांनी देखील शपथ घेतली. याची संपूर्ण लिस्ट वाचा...

Priya More

Summary -

  • बिहारमध्ये एनडीएचे सरकार पुन्हा आले

  • नितीश कुमार यांनी दहाव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली

  • नितीश कुमारांसोबत २६ मंत्र्यांनी देखील शपथ घेतली

  • उपमुख्यमंत्रिपदी सम्राट चौधरी आणि विजय कुमार सिन्हा यांनी शपथ घेतली

बिहारच्या पाटणामधील गांधी मैदान आज पुन्हा एकदा ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार झाले. याच मैदानावरून नितीश कुमार यांनी १० व्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी नितीश कुमार यांच्यासोबत २६ मंत्र्यांनी शपथ घेतली. राज्यपालांनी नितीश कुमार यांच्यासह सर्व मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

या शपथविधी सोहळ्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, अनेक केंद्रीय मंत्री उपस्थित होते. त्याचसोबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत इतर १६ राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी देखील या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावली. महाराष्ट्र, आसाम, हरियाणा, नागालँड मेघालय, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री देखील या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. या शपथविधी सोहळ्याला मोठ्या संख्येने बिहारचे नागरिकही आले होते. 'जय बिहार' आणि 'नितीश कुमार जिंदाबाद'च्या जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्या.

कुणी कुणी मंत्रिपदाची शपथ घेतली -

सम्राट चौधरी

विजय कुमार सिन्हा

विजय चौधरी

विजेंद्र यादव

श्रवण कुमार

मंगल पांडे

दिलीप जयस्वाल

अशोक चौधरी

लेशी सिंग

मदन साहनी

नितीन नवीन

रामकृपाल यादव

संतोष सुमन

सुनील कुमार

मोहम्मद जमान खान

संजय सिंग टायगर

अरुण शंकर प्रसाद

सुरेंद्र मेहता

नारायण प्रसाद

रामा निषाद

लखेंद्र कुमार रोशन

श्रेयसी सिंग

डॉ. प्रमोद कुमार

संजय कुमार

संजय कुमार सिंग

दीपक प्रकाश

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

दांडिया सुरू असताना कॉलेजमध्ये अनर्थ! लोखंडी सांगाडा कोसळून तरुणीचा मृत्यू, १७ विद्यार्थी जखमी, हादरवणारा व्हिडीओ

Nagpur Fort : विदर्भाची काशी! नदीच्या काठावर वसलाय ऐतिहासिक खजिना, सुट्टीत करा 'या' किल्ल्यावर भटकंती

Bigg Boss 20 : बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट! अचानक बाजी पलटली, 'या' स्पर्धकाचा पत्ता कट

Morning Walk Benefits: रोज सकाळी काही मिनिटं मारा फेरफटका, होतील 6 आश्चर्यकारक बदल

SCROLL FOR NEXT