Bihar Election update Saam tv
देश विदेश

Bihar Election : NDA चा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला; भाजप-जेडीयू किती जागांवर निवडणूक लढणार? जाणून घ्या

Bihar Election update : NDA चा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरलाय. भाजप-जेडीयू हे प्रत्येकी १०१ जागा लढतील.

Vishal Gangurde

बिहार निवडणुकीसाठी NDA चा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला

भाजप आणि जेडीयू प्रत्येकी 101 जागांवर निवडणूक लढणार

बिहारमध्ये चिराग पासवान यांचा पक्ष 29, उपेंद्र कुशवाहा आणि जीतनराम मांझी प्रत्येकी 6 जागांवर लढणार

बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. नवी दिल्लीच्या मॅरेथॉन बैठकांमध्ये हा फॉर्म्युला ठरला. या निवडणुकीत भाजप आणि जेडीयू हे १०१ जागांवर लढतील. तर चिराग पासवान यांचा पक्ष २९,उपेंद्र कुशवाहा यांचा आरएलएम पक्ष ६ जागांवर निवडणूक लढणार आहे. तर जीतनराम मांझी यांच्या HAM पक्षाला ६ जागा मिळाल्ला आहेत.

एनडीएतील जागावाटपाने स्पष्ट झालं की, यंदाच्या बिहार विधानसभा निवडणुकीत मोठा आणि लहान भावाची अशी कोणत्याही पक्षाची भूमिका नसणार आहे. भाजप आणि जेडीयूने प्रत्येकी १०१-१०१ जागा वाटून घेतल्या आहेत. एकसमान जागा वाटपाविषयी बिहारच्या प्रदेशाध्यक्षांनी आधीच संकेत दिले होते. यंदाच्या निवडणुकीत लहान आणि मोठा भाऊ अशी कोणत्याही पक्षाची भूमिका नसणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.

एनडीएचं जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्यानंतर चिराग पासवान यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली. बिहार विधानसभा निवडणुकीचं जागावाटप अखेर व्यवस्थित झाल्याचे त्यांनी जाहीर केले. एनडीएने जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर करत बिहार निवडणुकीत आघाडी घेतली आहे. आता साऱ्यांचं लक्ष इंडिया आघाडीकडे असणार आहे.

चिराग पासवान हे बिहारमधील तीन जागांवर खूप आग्रही होते. भाजपशी चर्चा करून त्यांनी तिन्ही जागा पदरात पाडण्यात यशस्वी ठरले आहेत. बिहारमधील हिसुआ, गोविंदगज आणि ब्रह्मपूर या तिन्ही विधानसभा मतदारसंघ पासवान यांच्या वाट्याला आले आहेत. जितनराम मांझी यांनी स्पष्ट केलं आहे की, 'आम्हाला ६ जागा मिळाल्या आहेत. आमची एनडीएच्या विरोधात कोणतीही नाराजी नाही.'.

दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजप मु्ख्यालयात पोहोचले आहेत. त्यांच्यासहित अनेक दिग्गज मंत्री आहेत. बिहारच्या जागावाटपाचा फॉर्म्युला अंतिम झाल्यानंतर भाजप उमेदवारीवरून भाजप मुख्यालयात चर्चा सुरु झाली आहे. या बैठकीत अनेकांची नावे निश्चित केली जाण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ठाणेकरांनो पाणी जपून वापरा; कोणत्या भागातला पाणीपुरवठा राहणार बंद?

Maharashtra Live News Update : देवळीतील भाजपाची विजय संकल्प सभा

Election Commission : निवडणूक यादीतील घोळाची सत्ताधाऱ्यांना झळ; विरोधीपक्षानंतर भाजपने घेतली हरकत, नेमकं काय घडलं?

Dr Gauri Gajge Case: डॉ. गौरी गर्जे यांची आत्महत्या की हत्या? शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक माहिती उघड

Mangalsutra Importance: काळा रंग अशुभ मानतात, तरीही मंगळसूत्राचे मणी काळे का असतात?

SCROLL FOR NEXT