BJP announces 40 star campaigners for Bihar elections; Maharashtra leaders Devendra Fadnavis, Nitin Gadkari, and Vinod Tawde among key faces. saam tv
देश विदेश

Bihar Election: भाजपनं ५ राज्याच्या मुख्यमंत्र्यांना लावलं प्रचाराच्या कामाला; बिहार निवडणुकीत महाराष्ट्रातील ३ नेत्यांवरही मोठी जबाबदारी

Bihar Election Campaign Politics: भाजपने २०२५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीसाठी ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केलीय. यात पाच मुख्यमंत्र्यांचा समावेश आहे. या स्टार प्रचारकांमध्ये महाराष्ट्राचे नेते देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी आणि विनोद तावडे यांच्यावर प्रमुख जबाबदारी सोपवण्यात आलीय.

Bharat Jadhav

  • बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केलीय.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदींसह पाच मुख्यमंत्र्यांचा हाती प्रचाराची धुरा

  • महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी आणि विनोद तावडे यांना मोठी जबाबदारी

बिहार विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं असून सर्व पक्षांकडून तयारी सुरू आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युती, जागा वाटप यांचीही चाचपणी सुरू झालीय. यादरम्यान भाजपने बिहार निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह ४० नेत्यांचा यादीत समावेश करण्यात आलायं.

Bihar Election: भाजपनं ५ राज्याच्या मुख्यमंत्र्यांना लावलं प्रचाराच्या कामाला; बिहार निवडणुकीत महाराष्ट्रातील ३ नेत्यांवरही मोठी जबाबदारी

भाजपनं आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केलीय. यात महाराष्ट्रातील तीन नेत्यांवर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा स्टार प्रचारक म्हणून समावेश करण्यात आलाय. तसंच बिहार विधानसभा प्रभारी विनोद तावडेदेखील स्टार प्रचारकांच्या यादीत आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरीदेखील बिहारमध्ये प्रचार करणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, जे. पी. नड्डा, राजनाथ सिंह, अमित शाह, नितीन गडकरी, शिवराज सिंह चौहान, धर्मेंद्र प्रधान, गिरीराज सिंह, योगी आदित्यनाथ, रेखा गुप्ता, मोहन यादव, हिमंत बिस्वा शर्मा, स्मृती इराणी, केशव प्रसाद मौर्य आणि सी.आर.पाटील यांना स्टार प्रचारक करण्यात आलंय. तसेच सम्राट चौधरी, विजय कुमार सिन्हा, रेणु देवी, नित्यानंद राय, मनोज तिवारी, रवी किशन, रवीशंकर प्रसाद आणि दिनेश लाल ‘निरहुआ’ यांनाही स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान देण्यात आले आहे.

बिहार निवडणुकीसाठी भाजपची दुसरी यादी जाहीर

भाजपचे राष्ट्रीय महासचिव आणि मुख्यालय प्रभारी यांनी १२ उमेदवारांची यादी जाहीर केली. गायिका मैथिली ठाकूर यांना अलीनगर आणि माजी पोलीस अधिकारी आनंद मिश्रा यांना बक्सर येथून उमेदवारी देण्यात आलीय. तर छोटी कुमारी यांना छपरा येथून उमेदवारी देण्यात आली आहे. राम चंद्र प्रसाद यांना हायाघाट, रंजन कुमार यांना मुजप्फरपूर, सुभाष सिंह यांना गोपालगंज, केदारनाथ सिंह यांना बनियापूरमधून तिकीट मिळालंय. विनय कुमार सिंह यांना सोनपूर, वीरेंद्र कुमार यांना रोसडा डा. सियाराम सिंह यांना बाढ, महेश पासवान यांना अगिआंव, राकेश ओझा यांना शाहपूर, माजी आयपीएस आनंद मिश्रा यांना बक्सर येथून उमेदवारी देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali 2025: देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय असतात 'या' राशी; दिवाळीमध्ये गडगंज श्रीमंत होणार व्यक्ती

Maharashtra Politics: सोलापुरात मोठी राजकीय उलथापालथ; भाजपची ताकद वाढली, बड्या नेत्यांसह पदाधिकाऱ्यांचा जम्बो पक्षप्रवेश

Mumbai Bar News : मुंबईतील प्रसिद्ध बारमध्ये अल्पवयीन मुलींना दिली दारू, दोघींची प्रकृती खालवल्यामुळे खळबळ

Maharashtra Live News Update: माढ्यातील पूरग्रस्तांसाठी 25 लाख रुपयांची औषधे

Today's horoscope: शुक्रवार शुभ! श्रवण नक्षत्र आणि शुभ योगाचा संयोग; ‘या’ राशींचं भाग्य जबरदस्त चमकणार

SCROLL FOR NEXT